तस्कराच्या घरातून सव्वा पाच किलो गांजा जप्त Five and a half kilos of ganja seized from smuggler's house

0


तस्कराच्या घरातून सव्वा पाच किलो गांजा जप्त

Five and a half kilos of ganja seized from smuggler's house

एलसिबीची कारवाई


वणीः- सध्या लपून छपून गांजाची तस्करी सुरू आहे. यातच जिल्हा पोलीस अधिक्षकांनी जिल्ह्यात अमली पदार्थ विक्री करणा-या विरूध्द कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्यावरून एलसिबीचे पथक अवैध धंदे करणा-यांचा मागोवा घेत असतांना पाटणबोरी येथिल गांजा तस्करी करणा-याच्या घरी झाडझडती घेत पाच किलो दोनशे 71 ग्रॅम गांजा जप्त केल्याची घटना 14 मार्च बुधवारला उघडकीस आली आहे.Five and a half kilos of ganja seized from smuggler's house

sangini news



जिल्ह्यात छुप्या मार्गाने अमली पदार्थाची तस्करी सुरू आहे. परिणामी शाळकरी मुलेही नशेच्या आहारी गेले आहे. याबाबतचे गांभिर्य लक्षात घेत जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ पवन बन्सोड यांनी अमली पदार्थ विक्री करणा-या विरूध्द कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्यावरून अवैध धंदे करणा-यांचा पांढरकवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत शोध घेत असतांना पाटणबोरी येथे एका व्यक्तीच्या घरी गांजा साठवून असल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळताच त्यांनी याबाबतची माहिती वरिष्ठांना दिली. आणि राजपत्रीत अधिकारी, तालुका कृषी अधिकारी,पंच,मापारी, फोटाग्राफर आणि स्थानिक पोलीसांना सोबत घेत पाटणबोरी येथे जावून शिवाजी चौक भागात राहणा-या गंगाधर नारायण पत्रीवार 43 याच्या घरी छापा टाकला असता घरातील एका खोलीत पांढ-या रंगाच्या गोणीत हिरवट,काळपट गांजा ज्यात पाने,फुले,देठ आदी वनस्पती असलेला एकूण पाच किलो दोनशे 71 ग्रॅम वजनाचा 63 हजार पाचशे 76 रूपयांचा गांजा मिळून आला. सदर घटनास्थळी पंचनामा करून पांढरकवडा पोलीसांत गंगाधर पत्रीवार रा. पाटणबोरी याचे विरूध्द गुन्हा दाखल करून त्याला पोलीसांच्या ताब्यात दिले आहे.Five and a half kilos of ganja seized from smuggler's house


सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ पवन बन्सोड, अप्पर पोलीस अधिक्षक पियुष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वैजने पांढरकवडा यांच्या आधारसिंग सोनोने पोलीस निरिक्षक स्थानिक गुन्हे शाखा,दिनेश झांबरे ठाणेदार पांढरकवडा, व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरिक्षक रामेश्वर कांडुरे, सुनिल खंडागळे, सुधिर पांडे, निलेश निमकर, सुधिर पिदूरकर, रजनिकांत मडावी,नरेश राउत, व पो.स्टे पांढरकवडा येथील किशोर आडे, छंदक मनवर, तुकाराम जंगवाड आदींनी केली आहे.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top