नऊ वर्षीय मो.अलीचा पहिला रोजा पूर्ण. Nine-year-old Md Ali completes his first fast.
वणी :
येथिल काळे ले आऊट नगर मधील मो. अली मोहम्मद इक्बाल शेख या नऊ वर्षांच्या चिमुरड्याने पवित्र रमजानचा पहिला रोजा पुर्ण केला आहे. परिणामी अली चे मुस्लिम बांधवांनी अभिनंदन केले आहे.
इस्लाममध्ये कलमा, नमाज, रोजा, जकात, हज हे पाच प्रमुख तत्व आहे. यात प्रत्येकाने रोजा ठेवणे बंधनकारक आहे. रमजान महिन्यात मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात रोजे (उपवास) करतात. मोठ्यासह लहान मुलेही रमजानचे उपवास करतात.Nine-year-old Md Ali completes his first fast.
अलीने पहिला उपवास करण्याचा हट्ट करत तो सकाळी पाच वाजता पासून सायंकाळी साडेसहा वाजता पूर्ण केला. रोजा सोडण्यापूर्वी अली ला नवीन कपडे हार घालण्यात आले. सायंकाळी रोजा सोडण्यासाठी फलहार देऊन त्याने उपवास सोडला.
मो.अली हा पत्रकार इक्बाल शेख यांचा मुलगा आहे.