तरुण शेतकऱ्याची विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या. Young farmer commits suicide by consuming poison
शेलू (खुर्द) येथील घटना
वणी:-(रवी ढुमणे) पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या शेलू (खुर्द) येथील ३९ वर्षीय तरुण शेतकऱ्याने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना बुधवारचे सायंकाळी पाच वाजताचे सुमारास उघडकीस आली आहे.
तालुक्यातील शेलू(खुर्द) येथील माजी पोलीस पाटील गोपीचंद आवारी यांना दोन मुले आहेत. दोघेही शेती करतात. यातील संदीप गोपीचंद आवारी हा बुधवारी १३ मार्च ला दुपारी १२ वाजताचे सुमारास शेतात गेला होता. सायंकाळ होत आली तरी संदीप घरी परतला नाही. जेवण करायला सुद्धा आला नाही. परिणामी त्याच्या नातेवाईकांनी शेतात जाऊन बघितले असता संदीप शेतातच मृत अवस्थेत पडून दिसला. त्याने विषारी द्रव्य प्राशन केल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती नातेवाईकांनी वणी पोलिसांना दिली असता. हवालदार विकास धडसे, सागर सिडाम यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वणीच्या ग्रामीण रुग्णालयात हलविला आहे.Young farmer commits suicide by consuming poison
संदीप व त्याच्या भावाच्या नावे शेती आहे. त्याने टोकाचे पाऊल का उचलले हे मात्र अनुत्तरित आहे. पुढील तपास वणी पोलीस करीत आहे.