गळफास घेऊन टेलरची आत्महत्या.
Taylor's suicide by hanging.वणी:- पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या कोंडण्यावाडी, रंगनाथ नगर भागात टेलरिंगचा व्यवसाय करणाऱ्या ४२ वर्षीय टेलर ने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी १० वाजताचे सुमारास उघडकीस आली आहे.
शहरातील रंगनाथ नगर भागातील कोणण्यावाडी येथे मारोती विठ्ठल ठावरी ४२ हे पत्नीसह कपडे शिवणकाम करण्याचा व्यवसाय करीत होते. गेल्या पाच वर्षांपासून मारोती ला पोटाचा आजार होता. शुक्रवारी सकाळी त्याने पत्नीला दूध आणण्यासाठी बाहेर पाठविले होते. पत्नी दूध घेऊन परत आल्यावर मारोती ने घरातील अडयाला असलेल्या पंख्याला नायलॉन दोरीने गळफास लावल्याचे दिसताच तिने टाहोच फोडला. या घटनेची माहिती वणी पोलिसांना देण्यात आली. संतोष आढाव व सहकारी घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी घटनास्थळ पंचनामा करून मारोती चा मृतदेह वणीच्या ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी दाखल केला होता.Taylor's suicide by hanging.