वणी :- (Sangini News) येथील रेल्वे कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानात ४२ वर्षीय विवाहित तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना १८ मार्च ला उघडकीस आली आहे.
सोमवारी रात्री त्याला अस्वस्थ वाटू लागले. त्याने आपल्या आईला फोन करून याबाबत सांगितले, लागलीच आईने अतिष च्या पत्नीला फोन केला. परंतु तिने फोन उचलला नाही. त्यानंतर आईने अतिष च्या चुलत भावाला फोन करून माहिती दिली. अतिशच्या चुलत भावाने अतिशच्या पत्नीला फोन केला व अतिशची प्रकृती बिघडली असल्याची माहिती देताच अतिशच्या पत्नीने निवासस्थान गाठले असता अतिष निपचित खाटेवर मृत पडून असल्याचे दिसले.
या घटनेची माहिती वणी पोलिसांना देताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून अतिशचा मृतदेह वणीच्या ग्रामीण रुग्णालयात हलविला होता. पुढील तपास वणी पोलीस करीत आहे.

