अवकाळी पावसाने मजुरदाराला केले बेघर
वणी:- (Sangini News)
वणी परिसरात रविवार पासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडत आहे. यातच सोमवारी चार वाजताचे सुमारास आलेल्या वादळी पावसाने चेंडकापुर येथील मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबाचे घरच उध्वस्त केले आहे. परिणामी शासनाने त्याला मदत करण्याची गरज आहे.
सध्या जिकडेतिकडे अवकाळी पावसाने कहरच केला आहे. कुठे गारपीट,तर कुठे वादळी पाऊस अशा स्थितीत शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतातील गहू कापणीला आला असतांना अवकाळी पावसाने बळीराजा पुरता वैताला आहे. रविवारी आकाशात ढग जमू लागले आणि लगेच वादळी पाऊस कोसळला. आणि सोमवारी चार वाजताचे सुमारास वादळी पाऊस सुरू झाला. यात बाबापूर ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या चेंडकापुर येथील सूरज मांडवकर या मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबाचे घर वादळी पावसात कोसळले आहे. संपूर्ण कुटुंब उघड्यावर आले आहे. कुटुंबात सहा लोक आहे. राहायला घर नाही. अशी बिकट अवस्था या अवकाळी पावसाने मांडवकर कुटुंबियांची केली आहे. Unseasonal rain made the laborer homeless

