-->

घोंसा मार्गावर रंगली पोलिसांची धुळवड Sangini News Wani

0

 घोंसा मार्गावर रंगली पोलिसांची धुळवड

वणी:- (रवी ढुमणे) Sangini News

होळीचा सण अन पोलिसांचा बंदोबस्त यातच घोंसा मार्गावरील एका बिअर बार मध्ये वणी ठाण्यातील पोलिसांची चांगलीच धुळवड रंगली होती. शेवटी सामंजस्याने वाद मिटवून परतीच्या वाटेला लागल्याची माहिती आहे. सामान्य लोकांनी वाद किंवा हाणामारी केली तर त्यांना फटके मारणारे आता स्वतःच एकमेकांना फटके देत असल्याने यांच्या हाणामारी ला कोण फटके देणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. Wani Yavatmal.

Sangini News




होळीचा सण शांततेत आणि उत्साहात संपन्न झाला होता. सकाळी उठून लोक धुलीवंदनाच्या तयारीला लागले. जिकडेतिकडे धुळवडीच्या पार्ट्या रंगात आल्या होत्या. मग शासकीय सेवेत असलेले कर्मचारी थांबणार तरी कसे. त्यांचाही मोह आवरता आवरेना. मग पोलिसांनी पार्टीचे नियोजन करून तयारी केली. आणि जवळपास सहा जण पार्टीला निघाले.


घोंसा मार्गावर रंगली धुळवड. Wani Police


वणी पोलीस ठाण्यातील महत्वाचे समजले जाणारे कर्मचारी इतर कर्मचाऱ्यासह घोंसा मार्गावरील शहराच्या बाहेर असलेल्या बियर बार मध्ये पोहचले. पार्टी प्रमाणे यथेच्छ मदिरा ढोसली. आणि धुळवडीचा रंग पार्टीत चढायला सुरुवात झाली. वाद विवाद,गप्पागोष्टीही सुरू झाल्या अन ठिणगी पडली.  सध्या साहेबांच्या खास मर्जित असलेले शिपाई चिरीमिरीत अव्वल असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.


एकमेकांना केली मारहाण?


धुळवडीच्या पार्टीने चांगलाच रंग घेतला होता. ठाण्यात हुकमी एक्के असलेले कर्मचारी आपापसात भिडले होते. एकमेकांच्या अंगावर चाल करीत होते. त्याचे रूपांतर काही क्षण हाणामारीत सुद्धा झाले? प्रकरण तक्रारीवर सुद्धा आले होते. परंतु काही अवधीतच थंडावले असल्याची माहिती आहे. काहींनी सामंजस्य दाखवत पोलिसांची रंगलेली धुळवड येथेच थांबविली. धुळवडीच्या दिवशी शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त लावतात. परंतु येथे मात्र शांतता व सुव्यवस्थेचे पुरते धिंडवडे निघाल्याचे दिसते आहे. वणी ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांचा हा पहिलाच प्रसंग घोंसा मार्गावरील परिसरात अनेकांनी अनुभवला आहे.wani 

वादाचे कारण गुलदस्त्यात?


सदर वाद नेमका कोणत्या कारणाने झाला. यात चिरीमिरी चा वाद तर नसेल ना? अशा अनेक शंका उपस्थित होत आहे. एकूणच वादाचे कारण सध्यातरी गुलदस्त्यात आहे. Yavatmal Wani Police एकीकडे घरफोड्याचे गुन्हे उघड झाले नाहीत. केवळ चिरीमिरीत दंगअसलेली पोलीस यंत्रणा जनतेला न्याय देणार का? असा सवाल उपस्थित झाला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top