Young married woman commits suicide by hanging herself
Sangini News:- wani-Yavatmal
वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या पळसोनी येथील २५ वर्षीय विवाहितेने घराच्या आड्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना २७ मार्च बुधवारला दुपारी साडेतीन वाजताचे सुमारास उघडकीस आल्याची माहिती आहे.
तालुक्यातील पळसोनी येथील प्रणिता शंकर भट २५ हिचा विवाह साधारणतः अडीच वर्षांपूर्वी झाला होता. पती शंकर हा वणी शहरातील एका मोबाईल च्या दुकानात कामाला होता. तर प्रणिता ही सुद्धा शहरातील दुकानात काम करीत होती.
दोघेही काम करून प्रपंचाचा गाडा चालवीत होते. बुधवारला शंकर नेहमीप्रमाणे कामावर गेला होता. प्रणिता कामावर न जाता घरी एकटीच होती. दुपारी प्रणिताची सासू व भाची प्राणिताच्या घरी आल्या असता. प्रणिता ने घराच्या आड्याला असलेल्या लोखंडी फळीला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे दिसून येतात त्यांनी टाहो फोडला.
या घटनेची माहिती शंकर ला फोन करून दिली. त्याने लागलीच प्रणिताच्या वडिलांना सदरची माहिती दिली. आणि दोघेही पळसोनी येथील घरी आले व त्यांनी गळफास घेऊन असलेल्या प्रणिता ला खाली उतरविले मात्र तिचा मृत्यू झाला होता.
या घटनेची माहिती पोलीस पाटील धोटे यांना दिली. पोलीस पाटलांनी तात्काळ पोलीस स्टेशन ला कळविले. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून प्रणिता चा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वणीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केला होता.
प्रणिता व शंकर दोघेही काम करून प्रपंच चालवीत असतांना अचानक प्रणिता ने आत्महत्येचे पाऊल का उचलले हा प्रश्न सध्यातरी अनुत्तरित आहे. Young married woman commits suicide by hanging herself

