वणी Yavatmal:- Sangini News
✍️Ravi Dhumne:-
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रदेश महिला काँग्रेस कमिटीने यवतमाळ जिल्हा महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदी संध्या बोबडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, अखिल भारतीय काँग्रेसच्या श्रीमती सोनिया गांधी यांचा दृष्टिकोन, आणि त्यांच्या समोर असलेली उद्दिष्टे व अखिल भारतीय महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा अल्का लांबा यांच्या नेतृत्वाखाली यवतमाळ जिल्ह्यात पक्षाचे कार्य पुढे घेऊन जाण्यासाठी, विविध स्तरातील महिलांना एकत्रित करून पक्ष संघटन वाढविणे व विकासाचे ध्येय पुढे घेऊन जाण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा संध्या सव्वालाखे यांनी यवतमाळ जिल्हा महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदी वणी विधानसभा मतदार संघातील संध्या बोबडे यांची नियुक्ती करीत अभिनंदन केले आहे.
Sandhya Bobde, district president of Yavatmal District Women's Congress

