-->

जिल्हा परिषद शिक्षकाचे अल्पशा आजाराने निधन Zilla Parishad teacher passed away due to a short illness

0

जिल्हा परिषद शिक्षकाचे अल्पशा आजाराने निधन



Sangini News:- वणी-यवतमाळ

जिल्हा परिषद शाळा सुर्ला येथे मुख्याध्यापक पदावर कार्यरत असलेल्या ४५ वर्षीय शिक्षकाचे अल्पशा आजाराने निधन झाल्याची घटना २७ मार्च बुधवारला घडली आहे. A Zilla Parishad teacher passed away due to a short illness
जिल्हा परिषद शिक्षकाचे अल्पशा आजाराने निधन



वणी तालुक्यातील रासा येथिल रामदास कोटनाके हे झरी जामनी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुर्ला येथे मुख्याध्यापक पदावर कार्यरत होते. २७ मार्च बुधवारला त्यांची प्रकृती अचानक बिघडली. यात त्यांना हृदय विकाराचा झटका आला असल्याचे सांगण्यात येत आहे. यातच रामदास कोटनाके या शिक्षकाचे निधन झाल्याची माहिती आहे.

सदर शिक्षकाच्या मागे पत्नी, दोन मुले व बराच मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी रासा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top