दुचाकी चोरट्यांकडून पाच दुचाकी जप्त वणी पोलिसांची कारवाई Five bikes seized from two-wheeler thieves Vani police action

0
Sangini News


दुचाकी चोरट्यांकडून पाच दुचाकी जप्त.

वणी पोलिसांची कारवाई.


वणी:-Five bikes seized from two-wheeler thieves. Vani police action.
पोलीस स्टेशन हद्दीत गेल्या काही दिवसापासुन मोटर सायकल चोरीचे प्रमाण वाढले होते. त्या अनुषंगाने वरिष्ठांनी दुचाकी चोरीचा छडा लावून सदरचे गुन्हे त्वरित उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते. त्याअनुषगाने पोलीस स्टेशन वणीचे पोलीस निरीक्षक अनील बेहेरानी ठाणेदार पोलीस स्टेशन वणी यानी गुन्हे शोध पथक व सर्व बिट अमलदार यांना सक्त आदेशीत करून अज्ञात आरोपीत इसमाचा शोध घेवुन गुन्हे उघडकीस आणण्याबाबत निर्देश देवून सविस्तर मार्गदर्शन केले होते. आणि पोलीस जमादार आणि पथकाने चोरट्यांचा शोध घेत त्यांना जेरबंद करीत त्यांचे जवळून एकूण पाच दुचाकी जप्त केल्या आहेत.




वणी परिसरात दुचाकी चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले होते. परिणामी वरिष्ठांच्या आदेशावरून ठाणेदार अनिल बेहरानी यांनी वणी ठाण्यातील गुन्हे शोध पथक,सर्व बिट अंमलदार आदींना सक्त आदेशीत केले होते. पोलिस स्टेशन वणी येथे दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या आरोपी प्रफुल रमेश चौखे वय २५ रा. गुडगाव ता. भद्रावती जि.चंद्रपूर याची न्यायालयाकडून पोलिस कोठडी प्राप्त करून जमादार विकास धडसे यांनी तपास कौशल्याचा वापर करीत गुन्हा सुद्धा नमुद आरोपीने केला असल्याची कबुली दिली. त्याने चोरलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे.Five bikes seized from two-wheeler thieves. Vani police action.



फेब्रुवारी २०२४ मध्ये सुद्धा त्याने चिमूर जि चंद्रपूर येथून स्प्लेंडर दुचाकी चोरुन भालर वसाहत येथे दिल्याची कबुली दिली असल्याने त्याचे कडून भालर वसाहत येथून सदरची विना क्रमांकाची दुचाकी जप्त करण्यात आली आहे. सद्यस्थितीत सदर आरोपी इसमाकडून एकूण चार दुचाकी जप्त करण्यात आल्या आहे. याआधी डीबी पथकाने एक दुचाकी जप्त केली होती. सध्यातरी वणी हद्दीतील दोन गुन्हे उघडकीस आणले आहे. तर चंद्रपूर जिल्ह्यातील तीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.


पोलिस कोठडी दरम्यान केलेल्या कौशल्य पूर्ण तपासामुळेच सदरचे गुन्हे उघडकीस आले आहे. सदरची कार्यवाही वरिष्ठांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक अनिल बेहेरानी जमादार विकास धडसे, पोलीस अंमलदार सागर सिडाम शुभम सोनुले आदींनी केली आहे.


जमादाराचा कौशल्यपूर्ण तपास.


वणी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला जमादार विकास धडसे आधीपासूनच तपास कामात अग्रेसर राहिला आहे. मागील काळात सुद्धा अनेक गुन्हे त्यांनी उघड केले आहे. यातच दुचाकी चोरट्यांचा शोध घेऊन सहकारी शुभम सोनूले,सागर सिडाम यांच्या मदतीने त्यांनी कौशल्यपूर्ण तपास करीत दुचाकी चोरीचे गुन्हे उघड केले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top