-->

ब्रेकिंग वर्धा नदीत तीन युवक बुडाले

0

 

ब्रेकिंग:- वर्धा नदीत तीन युवक बुडाले. 


वणी:- वरोरा मार्गावरील वर्धा नदीत वणी शहरातील तीन युवक बुडाल्याची माहिती आहे. सदरची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे. शोधकार्य अद्यापही सुरूच आहे. Breaking:- Three youth drowned in Wardha river.
Sangini News



वणी शहरातील विठ्ठलवाडी भागात राहणारे संकेत नगराळे २७, अनिरुद्ध चाफले २२, हर्षित चाफले १६ अशी नदीत बुडालेल्या युवकांची नावे आहेत.

वरोरा तालुक्यातील भटाळी येथे महाशिवरात्री निमित्य यात्रा असते. यात्रेसाठी शहरातील ११ युवक गेले होते. यात्रेवरून परत येत असतांना वाटेत असलेल्या पाटाळा येथील वर्धा नदीत पोहायला उतरले. परंतु ११ युवकांपैकी तिघांना पोहता येत नव्हते. इतरांनी आरडाओरडा केला मात्र तिघांना बाहेर काढता आले नाही. परिणामी ते नदीत बुडाले. या घटनेची माहिती वणी व माजरी पोलिसांना कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे.


मित्रांची घाबरगुंडी


यात्रेवरून परत येत असतांना नदीत पोहण्याचा युवकांना मोह आवरला नाही. संकेत,अनिरुद्ध, हर्षित तिघे बुडत असतांना मित्रांची घाबरगुंडी उडाली होती. मात्र तिघांना बाहेर काढण्यासाठी शेवट अपयशच आले.Breaking:- Three youth drowned in Wardha river.


शोधकार्य सुरूच.


घटनेची माहिती मिळताच वणी व माजरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. शोधकार्य अद्यापही सुरूच आहे. मात्र वृत्तलीहीपर्यंत कोणाचाही शोध लागला नव्हता.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top