रेल्वेच्या अपघातात युवकाचा मृत्यू.
मांगली रेल्वे पटरी वरील घटना.
वणी:- मुकुटंबन पोलिसांच्या हद्दीत येणाऱ्या मांगली रेल्वे पटरीवर झालेल्या अपघातात २१ वर्षीय युवक ठार झाल्याची घटना बुधवारी सायंकाळचे सुमारास घडली आहे.Youth dies in train accident.
झरी जामनी तालुक्यातील मांगली येथील आकाश रविंद्र सातघरे हा युवक बुधवारी लघुशंकेसाठी रेल्वेच्या पटरीवर गेला होता. दरम्यान रेल्वे आली. आणि अपघात घडला. रेल्वे च्या धडकेत आकाश च्या डोक्याला गंभीर मार बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. सदर घटना मुकुटंबन पोलिसांना कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आणि गुरुवारी पहाटे चार वाजताचे सुमारास आकाश चा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी वणीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला होता.
या घटनेचा तपास मुकुटंबन पोलीस करीत आहे.Youth dies in train accident.