दैनंदिन अभिकर्त्याचे अपघाती निधन
Sangini News Wani-Yavatmal:- /
वणी येथील विविध मल्टीस्टेट सहकारी बँक तथा पतसंस्थेची दैनंदिन निधी जमा करणाऱ्या ५३ वर्षीय अभिकर्त्याचे गुरुवारी रात्रीचे सुमारास अपघाती निधन झाल्याची घटना घडली आहे.
वणी-यवतमाळ मार्गावरील घटना
वणी शहरातील राजेश नरसिंग पुण्यानी ५४ हे शहरात असलेल्या विविध मल्टीस्टेट बँक, पतसंस्थाची दैनंदिन निधी गोळा करण्यासाठी अभिकर्ता म्हणून काम करीत होते. गुरुवारी नेहमीप्रमाणे राजूर,वणी येथील खातेदारांची जमा रक्कम गोळा करून मारेगाव कडे जात असताना मांगरुळ नजीक राजेशला फोन आल्याने तो बोलण्यासाठी थांबला. दरम्यान मागून येणाऱ्या सुसाट कार ने राजेश ला जबर धडक दिली. यात राजेश खाली पडला व गंभीर जखमी झाला. लोकांनी त्याला वणीच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. परंतु प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी नागपूर येथे हलविले. त्यात राजेशचा रात्रीच मृत्यू झाला. हा अपघात रात्री ९ वाजताचे सुमारास घडल्याची माहिती आहे. सध्यातरी मागून धडक देणारे वाहन अज्ञात आहे.
मनमिळाऊ, हसमुख राजेश
राजेश पुण्यानी हा हा लहानपणा पासूनच हसरा मनमिळाऊ स्वभावाचा होता. अत्यंत कठीण परिस्थितीत त्याने अभियांत्रिकी चे शिक्षण केले. त्यानंतर शहरातील पतसंस्थेत दैनंदिन अभिकर्ता म्हणून काम सुरू केले. त्याचे वणी,राजूर,चिखलगाव, मारेगाव परिसरात भरपूर ग्राहक होते. त्याचा मनमिळाऊ स्वभाव व तो नेहमी हसतमुख राहत असल्याने सर्वांच्या परिचयाचा झाला होता. परिणामी राजेशच्या अपघाती निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
राजेशच्या मागे पत्नी ,दोन मुले,भाऊ असा मोठा आप्तपरिवार व मित्र मंडळी आहे. Accident wani-yavatmal road

