-->

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त राजूर येथे कार्यक्रमाची रेलचेल

0

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त राजूर येथे कार्यक्रमाची रेलचेल




वणी-Yavatmal(Sangini News)

लोकशाहीला लाजवेल असे महान कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी केले होते म्हणूनच आजही त्यांच्या कार्याचा जयजयकार होतोय असा सूर राजूर कॉलरी येथील आयोजित छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रमुख वक्त्यांनी केलेल्या भाषणातून उमटविला होता. प्रसंगी विविध कार्यक्रमाची रेलचेल ही यानिमित्ताने दिसून आली. यावेळी भरपूर लोकांनी या भरगच्च कार्यक्रमात उपस्थिती लावली होती.


"लोकशाहीला ही लाजवेल असे महान कार्य राजेशाहीत छत्रपती शिवाजी महाराजांनी केले म्हणून अजूनही होतोय जयजयकार"
कार्यक्रमातील मान्यवरांचा सूर




" शेतकऱ्यांना बी, बियाणे, शेतसारा कमी ठेवणे, दुष्काळात शेत सारा माफ करणे, शेतमालाचा देठा लाही हात न लावण्याचे फर्मान काढणे, महिलांवर अत्याचार करणाऱ्यांचे मुसक्या बांधून कठोर दंड देणे, गुलामांचा व्यापारावर बंदी म्हणजेच वेठबिगार, कष्टकऱ्यांचे शोषण बंद करणे, सर्व धर्मांना समान लेखणे आणि आपल्या सैन्यात बरोबरीचे स्थान देणे, कारभारात सामावून घेणे हे या छत्रपती शिवरायांचा कार्यामुळे रयतेला हे राज्य स्वतःचे आहे असे वाटायचे त्यामुळे त्यांच्यासाठी जीव द्यायलाही तयार असायचे.


परंतु आज लोकशाही मध्ये निवडून दिलेले राज्यकर्ते मात्र जातीभेद, धर्मांधता, महिलांवरील अत्याचार करणाऱ्यांना पाठीशी घालणे, त्यांच्यावर कार्यवाही न करणे, शेतकरी विरोधी, कामगार विरोधी कायदे करणे असे दुष्कृत्य करताना दिसत असल्याने छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य आजचा लोकशाही लाही लाजवतील असे महान कार्य असल्याने आज लोकशाहीत सुद्धा त्यांचा जयजयकार होतो आहे. असा सूर गुरुवारी राजूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथी प्रमाणे केल्या गेलेल्या जयंती कार्यक्रमात मार्गदर्शन करण्यासाठी आलेल्या वक्त्यांनी काढला.


या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून शिवसेना वणी विधानसभा प्रमुख तथा यवतमाळ जि. म. बँक लि. चे उपाध्यक्ष संजयभाऊ देरकर तर अध्यक्षस्थानी माजी जि.प. सदस्य संघदीप भगत तर प्रमुख पाहुणे म्हणून युवा सेनेचे अजिंक्य शेंडे, मा. उपसरपंच अशोक भगत, माकपचे कॉ. कुमार मोहरमपुरी, मा. सरपंच प्रणिता असलम, ग्रा. प. सदस्य अमर तीतरे, बबिता सिंग, रेहाना सिद्दीकी,ओम चिमुरकर व पत्रकार अजय कंडेवार उपस्थित होते.


प्रसंगी शिवसेना वणी विधानसभा प्रमुख संजय देरकर, संघदीप भगत, कुमार मोहरमपुरी, अजय कंडेवार यांनी या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यावर विचार मांडले.


विविध स्पर्धेचे आयोजन


या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज वेशभूषा व त्यांचा जीवनावर वक्तव्य असे स्पर्धेचे स्वरूप होते. या स्पर्धेत प्रथम पुरस्कार कु. लावण्या मारोती पूनवटकर, द्वितीय शाश्वत फुलझेले, तृतीय प्रतीक अमर सोलंकी तर प्रोत्साहन म्हणून अंशिका नंदकिशोर लोहकरे व लावण्या न. लोहकरे यांनी पटकाविले.


या कार्यक्रमात प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी म्हणून नियुक्ती झालेल्या प्रज्ञा मा. पूनवटकर यांचाही गौरव व सत्कार करण्यात आला. यावेळेस सुमधुर गीत गायन व क्लासिकल नृत्याचा सूर संगीतमय कार्यक्रम सुद्धा घेण्यात आला.


या कार्यक्रमाचे संचालन "सन्मान स्त्री शक्तीचा फाऊंडेशन" च्या उपाध्यक्ष दिशा अमृत फुलझेले यांनी केले. कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी युवा सेना शाखा प्रमुख अमृत फुलझेले, अभिजित सुरसे, सिनू दासारी, प्रफुल पाटील, आकाश जोगदंडे, बंडू मोडक, आकाश बोलगमवार, सचिन भालेराव, नामदेव व आदी वॉर्डातील कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top