शिवजयंती उत्सव मंडळ सत्कार सोहळ्याचे आयोजन Shiv Jayanti Utsav Mandal organized felicitation ceremony

0

  शिवजयंती उत्सव मंडळ सत्कार सोहळ्याचे आयोजन 

sangini news


Shiv Jayanti Utsav Mandal organized felicitation ceremony

वणी:- १९ फेबृवारी हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा अधिकृत जयंती दिवस. हा दिवस भारतातच नव्हे तर साऱ्या जगभर अत्यंत उत्साहात साजरा केल्या जात आहे. राजेशाहीच्या काळात शिवाजी महाराज यांच्यासारखा एक राजा भारतात लोकशाहीची तत्त्वे आपल्या कारभारातुन रूजवितो आणि आपले राज्य लोकांच्या कल्याणाकरिता समर्पित करतो.ही बाब जगातील संशोधकांना आजही आकर्षित करत आहेत.महाराष्ट्रात तर या दिवसाला उत्साहाचे जणु उधाण आलेले असते.शिवजयंती उत्सव आता मनोरंजन,सांस्कृतिक,वैचारिक अशा विविध पद्धतीने साजरा होतो आहे.एक प्रकारे हा आता लोकउत्सव झाला आहे.Shiv Jayanti Utsav Mandal organized felicitation ceremony

शिवजयंती उत्सवाचे ऐतिहासीक महत्व लक्षात घेऊन मराठा सेवा संघाचे वतीने वणी,मारेगांव,झरी तालुक्यातील सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळांचा भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. ९ मार्च शनिवारला दुपारी २:३० वाजता कुणबी समाज सांस्कृतिक भवन,साधनकरवाडी,वणी येथे हा सत्कार सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडेल.मराठा सेवा संघ,संभाजी ब्रिगेड,जिजाऊ ब्रिगेड वणी,मारेगांव,झरी तालुका यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित या सत्कार सोहळ्यास साहित्यिक तथा सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार बुटे,यवतमाळ हे प्रमुख मार्गदर्शन करतील.

१९ फेबृवारी हा शिवजयंती उत्सव वणी,मारेगांव,झरी तालुक्यात साजरा करणाऱ्या सर्व सार्वजनिक मंडळ/ आयोजकांना या कार्यक्रमात सन्मानित करण्यात येणार आहेत. करिता संबंधित शिवजयंती आयोजकांनी ५ मार्च पर्यंत आपला संपुर्ण तपशिल अजय धोबे व दत्ता डोहे (वणी तालुका),अनामिक बोढे व लहु जिवतोडे (मारेगांव ) आणि केतन ठाकरे व देव येवले (झरी तालुका) यांचेकडे पाठविण्यात यावा.असे आवाहन मराठा सेवा संघ परिवाराचे वतीने करण्यात आले आहे.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top