-->

स्वयंपाक घरातील हे सात मसाले करणार शारीरिक व्याधी दूर

0



स्वयंपाक घरातील हे सात मसाले करणार शारीरिक व्याधी दूर




Best Health Spices स्वयंपाक घरातील मसाले healthy Spices

स्वयंपाक-घरातील-हे-सात-मसाले-करणार-शारीरिक-व्याधी-दूर

हळद


हळद लहानपणी जेव्हा आपण खाली पडायचो त्यावेळी आपली आई हळदीचे दूध प्यायला देऊन ज्या ठिकाणी मार लागला त्याठिकाणी लेप लावायची

हळदीमध्ये खूप fibre तंतुमय संपत्ती आहे. हळदीचा वापर चेहऱ्यावर लावायला होतो. पूर्वीपासून लग्नात हळदीचा कार्यक्रम ठेवल्या जातो.संपूर्ण अंगाला हळद लागल्याने त्वचेचे रोग बरे होतात, कच्ची हळद पाण्यात उकळून प्यायला घेतली तर डोळ्यांचे विकार, आदी बरे करण्यास मदत होते. मौल्यवान हळद ताप, सर्दी, खोकला यावर गूळ हळद घालून काढा पिला तरी छातीत साचलेला कफ बाहेर पडतो. म्हणूनच म्हणत होते की,पी हळद अन हो गोरी. अगदी तंतोतंत अशी ही रामबाण हळद

जिरे


जिरे असा मसाला आहे की आपल्या आरोग्याच्या विविध तक्रारीवर मात करतो. जसे लघवीत जळजळ, एक चमचा जिरे उकळून पिले तर लघवीचा त्रास नक्कीच कमी होतो.

अपचनाचा त्रास, जेव्हा आपल्याला अपचन,करपट ढेकर,पोट भरल्यासारखे वाटणे, असे लक्षणे दिसू लागली की, एक चमचा जिरे घेऊन ते चावून चावून घेतल्यावर वरून एक ग्लास कोमट पाणी पिले तर लगेच ऍसिडिटी चुटकीत गायब होईल. आणि जर पावसाळ्यात आपल्याला पातळ सौच होत असेल तर आणि अशक्तपणा वाटत असेल तर एक चमचा जिरे भाजून घ्यायचे व ते चावून खाल्ल्याने लगेच आराम मिळतो.

लाल मिरची तिखट


लाल मिरची आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. परंतु विशिष्ट मात्रा घेतली तर, ज्या व्यक्तींची चरबी वाढली आहे. त्यांनी जर लाल मिरची चे विशिष्ट मात्रा मध्ये सेवन केल्याने अंगावरील चरबी कमी होईल. Bad cholesterol anti Antioxidant असल्याने मिरची भाजीत किंवा पाण्यात विशिष्ट प्रमाणात घेतली तर अंगावरील वाढलेली चरबी जळण्यास सुरुवात होईल. आणि सोबतच जे लाल तिखट नियमित वापरत असेल त्यांची पचनशक्ती सुदृढ राहते.

कलमी दालचिनी

सुगंधित कलमी,कोरोना काळात सिद्ध झाले. की ज्यांनी कलमी पावडर सेवन केली त्यांची प्रतिकारशक्ती मजबूत होती. सोबतच ज्या लोकांचे शुक्राणू कमी आहे. वैवाहिक जीवनात आनंद घेता येत नाही. शरीर सुदृढ राहत नसेलअशा लोकांनी कलमी दोन तीन चिमूट,एक चमचा सहद, वरून दूध पिले, तर याचा नक्कीच फायदा होईल. आणि शरीरात ऊर्जा निर्माण होऊन शरीर पिळदार दिसेल. चिडचिडेपणा कमी होईल. कलमीत/दालचिनी तंतुमय पदार्थ भरपूर असल्याने ज्यांना अपचनाचा त्रास आहे. तो दूर होईल. पचनसंस्था मजबूत होईल. ज्या लोकांना मधुमेहाचा त्रास आहे. किंवा साखरेचे प्रमाण असंतुलित असेल, अशा लोकांनी कलमी/दालचिनी चे सेवन अवश्य करावे.


अजवाईन /ओवा

जी व्यक्ती ओव्याचे/अजवाईन चे नियमित सेवन करीत असेल त्यांच्या पोटाचे विकार नाहीसे होतील. लहान मुलांना पोटात जंत झाल्यास अर्धा चमचा ओवा पावडर त्याला ताकात दिली तर पोटात असलेले किडे मरून जाईल. ओवाच्या सेवनाने गॅस, ऍसिडिटी, दूर होईलच पण जर का आपण जड जेवण केले तर ते सुद्धा पचायला हलके होईल. ज्यांना भूक लागत नसेल त्यांनी एक चमचा ओवा भाजून घ्यावा, व दिवसातून दोन वेळा पाण्यासोबत चूर्ण घेतले तर भूक वाढायला सुरुवात होईल.

जायफळ

जायफळ असे फळ आहे की, ते सर्वांच्या परिचयाचे आहे. याला गरम मसाल्याची शान म्हणूनही संबोधले जाते. ज्या लोकांच्या तोंडातून दुर्गंधी येत असेल. किंवा दातात कीड लागली असेल. पायरिया चा आजार असेल. हिरड्यातून रक्त येत असेल अशा लोकांनी जायफळाचे नियमितपणे सेवन करावे. ज्या लोकांची स्मरणशक्ती कमी असेल. त्यांनी सुद्धा जायफळाचे सेवन नियमित करावे.

लवंग

जी व्यक्ती ऍसिडिटी सारख्या समस्येने ग्रासली असेल त्या व्यक्तींनी एक लवंग तोंडात चघळत राहिली तर त्रास कमी होईल. ज्यांच्या दातात किडे असेल. हिरड्यांच्या तक्रारी असेल, हिरड्यातून रक्त येत असेल, तोंडाची घाणेरडी वास येत असेल अशा लोकांनी एक लवंग नियमितपणे तोंडात चघळून खाल्ली तर या समस्येवर नक्कीच मात करू शकेल. आपल्याला सर्दी,खोकला,ताप यासारख्या समस्या असेल, तर त्या व्यक्तींनी लवंग व काळी मिरी चे चिमूटभर चूर्ण सेवन केल्याने नक्कीच फायदा होईल.


मग आवडले ना घरगुती उपाय. तर असे लक्षण,आजार दिसल्यास प्रथम हे घरगुती उपाय नक्की करून बघा. खूप फायदा होईल.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top