-->

वणी ठाण्यात सध्या चाललंय तरी काय? गुन्ह्यांचा छडा लागता लागेना

0

वणी ठाण्यात सध्या चाललंय तरी काय? गुन्ह्यांचा छडा लागता लागेना








Sangini News:- Wani-Yavatmal -Ravi Dhumne


गेल्या काळात वणी ठाण्यात असलेल्या अधिकाऱ्यांनी वचक ठेवत गुन्हेगारीवर चांगलाच जम बसविला होता. मात्र सध्याच्या काळात तसे होतांना दिसत नाही. चोऱ्या,घरफोड्या सारख्या गुन्ह्यांचा छडा लावण्यात वणी पोलीस सपशेल अयशस्वी झाल्याचे बघायला मिळते आहे. तर दुसरीकडे मर्जीतील लोकांना खास जबाबदारी दिल्याने धुळवड सारखे प्रकार व्हायला सुरुवात झाली आहे. जेथे सामान्य कर्मचारी सुरक्षित नाही तिथे जनता सुखी कशी राहणार? असा प्रश्न जनमानसात उपस्थित होतांना दिसतो आहे. What is going on in Wani Police Thane now? Crimes are rampant
वणी ठाण्यात सध्या चाललंय तरी काय? गुन्ह्यांचा छडा लागता लागेना
पोलीस स्टेशन वणी मधील कायदा व सुव्यवस्था ढासळली असल्याचे दिसून येत आहे. गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण नगण्य आहे. तसेच मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू असतांना त्यावर कार्यवाही सुद्धा होतांना दिसुन येत नाही. विशेषतः सध्या आय.पी.एल मॅचेस सुरू असुन मागील काही वर्षांपासून एकही मोठी कारवाई झाल्याचे सुद्धा बघीतले नाही. स्थानिक गुन्हे शाखे मार्फत मध्यंतरी तुटक तुटक कार्यवाही होताना दिसून आल्यात. परंतु वणी पोलीस स्टेशन मार्फत मागील काही वर्षात एकही कार्यवाही न होणे हे न समजणारे कोडेच आहे.


गुन्हे शोध पथक जैसे थे च!


पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकामध्ये सुद्धा कोणताही फेरबदल झाला नाही. यातील कर्मचारी व अवैध व्यावसायिक यांच्यात सर्व काही आलबेल असल्याचे दिसून येत आहे. अशातच गुन्हे शोध पथकातील कर्मचारी ऑल इज वेल च्या भूमिकेत वावरतांना दिसते आहे. यातील दोघे तर कुठेही कर्तव्यावर न दिसता,अवैध व्यावसायिकांच्या अवतीभवती घिरट्या घालतांना दिसते आहे. कोणत्याही घटनास्थळी हे दोघे तर दुर्मिळच आहे. परिणामी गुन्हे शोध पथक कुचकामी ठरताना दिसते आहे.


घोंसा मार्गावर रंगली पोलिसांची धुळवड


येथील साहेबांच्या खास मर्जीत असलेले कर्मचारी ऑल इज वेल च्या भूमिकेत वावरत असल्याने घोंसा मार्गावर त्याचा प्रत्यय आला. याचाच परिणाम म्हणून होळी सण झाल्यावर धुलीवंदनाच्या दिवशी कायदा व सुव्यवस्था ज्यांच्या खांद्यावर आहे ते डि.बी पथकातील काही विशेष कर्मचारी हे बंदोबस्त सोडून ओली पार्टी करण्यासाठी रासा रोडवरील एका विशिष्ट मर्जीतील व्यक्ती च्या बिअर बार मध्ये गेले होते. आणि मदीरा प्राशन करीत असतांना तेथे उपस्थित असलेल्या ठाण्यातील सर्वसामान्य कर्मचाऱ्यांशी विशेष कारणांमुळे वादविवाद झाला, वादाचे रूपांतर हाणामारीत झाले हा प्रकार बहुतांश लोकांनी उघड्या डोळ्यांनी पाहिला आहे. या प्रकाराची चर्चा संपुर्ण शहरात वाऱ्यासारखी पसरली होती. परंतु वाद निर्माण करणारे काही विशिष्ट कर्मचारी हे मर्जीतील असल्याने त्यांच्या विरोधात कोणी चिक्कार शब्द काढला नाही की माध्यमात चर्चा सुद्धा झाली नाही. हे विशेष!


सदर प्रकरणाची सारवासारव


सदर प्रकरण अंगलट येणार याची खात्री झाल्यावर यातील विशेष कर्मचाऱ्यांनी सदर बार मधील सि.सि.टी.व्ही फुटेज बार मालक व एका विशिष्ट कर्मचारी यांचा मित्र असलेल्या व्यक्ती ने लगेच डिलीट केल्याची सुद्धा खात्रीशीर माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे. दरम्यान सदर प्रकाराची माहिती ठाणेदार यांना प्राप्त होताच त्यांनी सि.सि.टी.व्ही फुटेज प्राप्त करून विशेष मर्जीतील कर्मचाऱ्यांना सोडून ठाण्यातील सर्वसामान्य कर्मचाऱ्या विरुद्ध कार्यवाही करणार असल्याचे समजते आहे.


सामान्य कर्मचारी ठरतेय बळीचा बकरा


धुळवडीच्या प्रकरणांमध्ये लेखन कर्मचारी, विशेष पथकातील विशेष मर्जीतील कर्मचारी हे गुंतले असतांना त्यांना सोडून ठाण्यातील सर्वसामान्य कर्मचारी यांनाच टार्गेट का केलं जातं आहे? हे सध्यातरी अस्पष्टच आहे. विशेषतः दोन गटात हाणामारी झाल्यावर एकाच गटा विरोधात कार्यवाही कशी? दुसऱ्या गटाला बाजूला का ठेवण्यात येत आहे. यात सामान्य कर्मचारी मात्र बळीचा बकरा होतांना दिसत आहे. परंतु सदर प्रकार खरा असेल तर यामध्ये दुजा भाव का? असा प्रश्न देखील उपस्थित होतो आहे.


ठाणेदार अनभिज्ञच.


वास्तविक पाहता ठाणेदार यांना प्रभार सांभाळून काही महिनेच झाले आहे. त्यांना येथील पुरेपूर माहिती नव्हती. परिणामी ठाणेदारांना अनभिज्ञ ठेऊन विशेष कर्मचारी हे त्यांची दिशाभूल करीत आपल्याच पाणग्यावर निवे ओढत असल्याचे वास्तव आहे. सदर प्रकरणात ठाणेदारांनी कोणालाही बाजूला न सारता सरळसरळ कार्यवाही करणे अपेक्षित आहे. जसे ठाण्यात तक्रार देण्यासाठी दोन गट येतात मग पोलीस विभाग दोन्ही बाजूवर कारवाई करते. अगदी तशीच कारवाई केली तर कोणावर अन्याय होणार नाही. अन्यथा ठाण्यातील इतर कर्मचाऱ्यांमध्ये दुजाभाव केला जात असल्याची जाणीव निर्माण होणार हे त्रिवार सत्य आहे.

तरीही सदर प्रकरणांमध्ये नेमकी काय कारवाई होणार आहे? हे येणाऱ्या काळामध्ये माहिती पडेलचं, परंतु एकतर्फी कारवाई होऊ नये, हा वणी येथील जनतेला आवर्जून पडलेला प्रश्न आहे.

बघुयात सदर प्रकरणात ठाणेदार एकाची बाजू घेणार की, दोन्ही गटावर कारवाई करणार?

तुर्तास इतकेच.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top