तलवारीच्या वारात एक गंभीर जखमी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
Wani-Yavatmal
Sangini News
वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या राजूर कॉलरी येथील २४ वर्षीय तरुणावर जुन्या वादातून तलवारीने वार करून जखमी केल्याची घटना शनिवारी रात्री १० वाजताचे सुमारास घडली आहे. तक्रारीवरून तिघांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील राजूर कॉलरी येथील रामकरण दयाप्रसाद केवट २४ हा मंजुरी करणारा तरुण गावात असतांना हिमेश बहुरीया २३ हा राजूर येथीलच तरुण दोन मित्रांसह तलवार फिरवत रामकरण जवळ आला दोघांचा जुना वाद होता. परिणामी त्याने जवळ येताच रामकरण च्या हातावर,डोक्यावर तलवारीने वार केले. व हिमेश साथीदारांसह तेथून पळून गेला. यात रामकरण गंभीर जखमी झाला. त्याने रात्रीच पोलीस ठाणे गाठले होते. त्याला रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले असता डॉक्टरांचा तपासणी वरून व रामकरण ने दिलेल्या तक्रारीवरून हिमेश बहुरीया व दोन साथीदारावर भा दं वि ३२४/३४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेचा तपास अमोल अन्नेरवार करीत आहे.

.jpg)