-->

पथदिव्याच्या खांबावर गळफास लावून तरुणाची आत्महत्या

0


पथदिव्याच्या खांबावर गळफास लावून तरुणाची आत्महत्या




Wani Yavatmal:- Sangini News

शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या बेलोरा येथील विद्युत,व नळ जोडणीचे काम करणाऱ्या २८ वर्षीय तरुणाने घराजवळील असलेल्या पथदिव्याच्या खांबावर गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली आहे.A young man committed suicide by hanging himself on a street lamp postपथदिव्याच्या खांबावर गळफास लावून तरुणाची आत्महत्या


तालुक्यातील बेलोरा येथील स्वप्नील सुधाकर भोंगळे २८, हा तरुण आईसोबत राहत होता. त्याच्या वडिलांचा याआधीच मृत्यू झाला होता. दोन बहिणींचे लग्न झाल्याने स्वप्नील व आई असे दोघेच घरात होते. तो गावात खाजगी विद्युत, व नळ जोडणीचे सुद्धा कामे करीत होता. शनिवारी सायंकाळी सहा वाजताचे सुमारास स्वप्नील घरून बाहेर गेला व परत रात्री घरी आला होता.

दरम्यान रात्रीच त्याने घरापासून शंभर मीटर अंतरावर असलेल्या गावातील पथदिव्याच्या खांबावर चढून गळफास लावला. सदर बाब सकाळी ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी गावातील पोलीस पाटील सौ भोंगळे यांना कळविले. पोलिस पाटील यांनी सदर घटनेची माहिती शिरपूर पोलिसांना दिली. माहिती मिळताच शिरपूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा करून स्वप्नील चा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वणीच्या ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला होता. स्वप्नील आईला एकटाच आधार असल्याने सध्यातरी ती निराधार झाली आहे. त्याने आत्महत्या करण्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पुढील तपास शिरपूर पोलीस करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top