प्रतिभा धानोरकरांना अविरोध निवडून द्या.
Get Pratibha Dhanorkar elected unopposed.मविआ चे पत्रकार परिषदेत आवाहन
वणी(रवी ढुमणे) मागील काळात दिवंगत बाळू धानोरकर यांच्या निधनाने चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभेची जागा रिक्त झाली होती. दरम्यान त्या जागी पोटनिवडणूक झालीच नसल्याने महाराष्ट्राची परंपरा कायम ठेवत आमदार प्रतिभा धानोरकर यांना अविरोध निवडून देण्याचे आवाहन वणी येथील आयोजित पत्रकार परिषदेत मविआ च्या नेत्यांनी केले आहे.
बुधवारला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष टिकाराम कोंगरे यांनी मविआ च्या वतीने वणी येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेला महाविकास आघाडीचे नेते,पदाधिकारी उपस्थित होते. प्रसंगी माजी खासदार दिवंगत बाळू धानोरकर यांच्या निधनाने चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभेची जागा रिक्त झाली होती. मात्र आयोगाने सदर निवडणूक घेतली नाही. महाराष्ट्राची परंपरा आहे की, सहानुभूती म्हणून रिक्त झालेल्या जागी त्यांच्या कुटुंबातील सदस्याला एकमताने निवडून देत आलो आहोत. मात्र पोटनिवडणूक न झाल्याने आता सार्वत्रिक लोकसभेच्या निवडणुका लागल्या आहेत.Get Pratibha Dhanorkar elected unopposed.