चंद्रपूर जिल्ह्यातील तीन दुचाकी चोरटे गजाआड
वणी पोलिसांची कारवाई.
वणी:- (रवी ढुमणे)Three two-wheeler thieves in Chandrapur district
वणी शहरात दुचाकी चोरीच्या घटनेत वाढ झाली होती. परिणामी पोलीस चोरट्यांचा मागावर होते. यातच चोरटे चंद्रपूर जिल्ह्यातील असल्याची कुणकुण पोलिसांना लागली अन तीन दुचाकी चोरट्याना चार दुचाकीसह पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. परिणामी आणखी दुचाकी चोरीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.
वणी शहरातील अनेक भागातील दुचाकी अज्ञात चोरट्यानी लंपास केल्याच्या घटना घडल्या होत्या. पोलीस चोरी गेलेल्या दुचाकीचा शोध घेतच होते. ३ मार्च ला पोलीस हवालदार विकास धडसे हे त्यांचे पथकातील सागर सिडाम व शुभम सोनुले यांचे सह पेट्रोलींग करीत असतांना विकास धडसे यांना चंद्रपूर येथील एक व्यक्ती चोरी ची मोटरसायकल विक्री करण्यासाठी वणी येथील बस स्थानक येथे येणार असल्याची माहिती मिळाली त्यावरून सदर पथकाने बस स्थानक परिसरात सापळा रचून प्रफुल्ल रमेश चौखे वय २५ वर्षे रा. गुळगाव ता. भद्रावती जि. चंद्रपूर यास ताब्यात घेऊन त्याचे कडून विना नंबर प्लेट च्या दोन दुचाकीच्या मालकी हक्का बाबत त्याने कोणताही पुरावा सादर करु न शकल्याने प्रफुल कडून नमुद मोटरसायकल जप्त केल्या तसेच सदर इसमास वणी परीसरातील मोटरसायकल चोरी बाबत विचारपूस केली व बाजीराव चा हिसका दाखवताच त्याने १६ सप्टेंबर २०२३ रोजी लक्ष्मी नगर वणी येथील गणेश ढुमणे यांची हिरो स्प्लेंडर एम.एच.२९ एक्स.४६८८ ही लक्ष्मी नगर येथून चोरी केली असल्याचे कबूल केले. व गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यास कायदेशीर रित्या अटक करण्यात आली आहे.Three two-wheeler thieves in Chandrapur district
शहरात सध्या मोटरसायकल चोरीच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मोटरसायकल चोरीच्या घटनेत आळा बसावा म्हणून वणी येथे नवीन रूजू झालेले ठाणेदार अनिल बेहेराणी यांनी मोटरसायकल चोरीच्या घटना संदर्भात डि.बी.पथकाला मार्गदर्शन केले. शहरातील जैन लेआऊट परिसरात वास्तव्यास असलेले आशीष देठे यांची फॅशन प्रो.मोटर सायकल क्रमांक एम.एच.२९ ए.एफ.८३७८ ही ८ जानेवारी रोजी नंदिनी बार समोरून चोरी गेल्याची तक्रार वणी पोलिस स्टेशन येथे दाखल करण्यात आली होती. गुन्हा दाखल करून तपासात घेतला असता गोपनीय माहिती वरून डि.बी.पथक प्रमुख पोउपनि झाडोकार यांनी डिबी पथक सोबत घेऊन भद्रावती जिल्हा चंद्रपूर येथे जाऊन आरोपी पुनमचंद बंडू पोहीनकर २४ वर्ष रा.नांदा बिबि ता.कोरपना जिल्हा चंद्रपूर व गोलु संजय वरवाडे २१ वर्ष रा.भद्रावती जिल्हा चंद्रपूर येथून दोन आरोपी व चोरी गेलेली मोटरसायकल एम.एच.२९ एक्स. ४६८८ जप्त करण्यात आली आहे.
सध्यातरी चार दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. यातील तीन गुन्हे उघड झाले आहेत. परिणामी आणखी दुचाकी चोरीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.
सदरची कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश किंन्द्रे, ठाणेदार अनिल बेहेराणी यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि झाडोकार,स/फौजदार सुदर्शन वानोळे, जमादार विकास धडसे,पंकज उंबरकर, विशाल गेडाम,मो.वसिम,शाम राठोड,सागर सिडाम,शुभम सोनुले, गजानन कुडमेथे यांनी केली.