वणीत शिवसेना उ.बा.ठा.पक्षाची आढावा सभा संपन्न The review meeting of ShivSena U.B.T. party in Wani was concluded

0

 वणीत शिवसेना (उ.बा.ठा.)पक्षाची आढावा सभा संपन्न.

जिल्हा संपर्क प्रमुखांची उपस्थिती.


Sangini news

वणी(रवी ढुमणे) वणी येथील वसंत जिनिंग हॉल मध्ये मंगळवारी शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची आढावा सभा पार पडली. सभेला जिल्हा संपर्क प्रमुखांची उपस्थिती होती. या सभेला सर्व शिवसैनिकांनी हेवेदावे विसरून वणी विधानसभा क्षेत्रात भरीव काम करण्याचे आवाहन जिल्हा संपर्क प्रमुखांनी केले.The review meeting of ShivSena (U.B.T.) party in Wani was concluded.



वणी विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या वणी-झरी-मारेगाव येथील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची मंगळवार ला वसंत जिनिंग हॉलमध्ये जिल्हा संपर्क प्रमुख राजेंद्र गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तसेच वणी झरी मारेगाव विधानसभा प्रमुख संजय देरकर तसेच उपजिल्हाप्रमुख संजय निखाडे व उपजिल्हाप्रमुख शरद ठाकरे यांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांची आढावा सभा घेण्यात आली होती. आढावा सभेला वणी विधानसभा क्षेत्रातील मोठ्या संख्येने तीनही तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्याचे संपर्कप्रमुख राजेंद्र गायकवाड यांनी आढावा सभेला मार्गदर्शन केले. प्रसंगी वणी विधानसभा क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात निष्ठावंत शिवसैनिक आहेत. शिवसेनेची मोठी ताकद या तालुक्यात आहे. परिणामी सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन एकजुटीने पक्ष बांधणी करण्याची गरज आहे. कुठलेही हेवेदावे व मतभेद न ठेवता पक्षासाठी प्रामाणिक काम करावे व पक्ष मजबूत करावा जे सोबत येईल त्यांना घेऊन काम करावे. आणि ज्या कोणी पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले नसतील ते सर्व पदाधिकारी आज रोजी पदावर कायम आहे असे आवर्जून सांगितले. तसेच पक्ष हा कोणा एकट्याचा नसून सर्वसामान्य शिवसैनिकांचा आहे त्यामुळे पक्ष प्रमुखांनी नियुक्त केलेल्या पदाधिकाऱ्यांना कोणालाही डावलता येणार नाही. एकजुटीने जोमाने काम करून समोर होणाऱ्या विधानसभा निवडणुकी मध्ये वणी विधानसभा क्षेत्रात भगवा फडकवायचा आहे असे आवाहन केले.The review meeting of ShivSena (U.B.T.) party in Wani was concluded.

नवनियुक्त वणी विधानसभा प्रमुख संजय देरकर यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त करून मार्गदर्शन केले पक्ष प्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला आणि वणी विधानसभा क्षेत्राची जबाबदारी माझ्यावर सोपवली त्यांच्या विश्वासाला मी कधी तडा जाऊ देणार नाही. पक्षाकरिता तन-मन-धनाने काम करीन अगदी तळागळातील सामान्य शिवसैनिकांना व पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन पक्षासाठी काम करेल कधीही कोणत्याही पदाधिकाऱ्यांना किंवा शिवसैनिकांना माझी गरज भासल्यास मी सदैव सेवेत तत्पर आहे. अशी ग्वाही आढावा सभेमध्ये देरकरांनी दिली. उपजिल्हाप्रमुख संजय निखाडे यांनी सुद्धा आपले मनोगत आढावा सभेत व्यक्त केले. शरद ठाकरे यांनी आढावा सभेचे सूत्रसंचालन केले. प्रसंगी शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top