हृदयद्रावक
वनरक्षक भरती दरम्यान वणीच्या तरुणाचा नागपुरात मृत्यू
नागपूर येथील मैदानावर वनरक्षक पदाच्या भरतीसाठी गेलेल्या २८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. सदर तरुणाला एम्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केल्याची माहिती आहे.Heartbreaking.. Death of Wani youth in Nagpur during forest guard recruitment.
वणी तालुक्यातील पेटूर गावातील सचिन दिलीप लांबट हा तरुण वनविभागाच्या वनरक्षक पदाच्या भरतीसाठी तयारी करीत होता. तो वणीच्या शासकीय मैदानात सरावासाठी नियमित येत होता. ४ मार्च मंगळवारला सचिन भरतीसाठी नागपुरात दाखल झाला. वनरक्षक भरतीची शारीरिक क्षमता चाचणी पाच किलोमीटर अंतर पार करत असताना अवघ्या १० ते १५ मीटर अंतरावर सचिन अचानक पडला तो जागेवरून उठलाच नसल्याची माहिती आहे. त्याची प्रकृती गंभीर झाली. त्याला वनविभागाच्या चमूने नागपुरातील एम्स रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी सचिन ला मृत घोषित केले.Heartbreaking.. Death of Wani youth in Nagpur during forest guard recruitment.
आईवडिलांचा ही अपघात.
सचिन च्या घटनेची माहिती कळताच आईवडील पेटूर येथून नागपूरकडे रवाना झाले. दरम्यान बुटीबोरी नजीक त्यांच्या वाहनाला अपघात झाल्याची माहिती आहे. मात्र या अपघातात ते किरकोळ जखमी झाले असल्याचे सांगण्यात येत आहे.
शासकीय सेवेत जाण्याचे स्वप्न अधुरेच.
सचिन हा सामान्य कुटुंबातील तरुण होता. हलाखीच्या परिस्थितीत जगून त्याने शासकीय सेवेत दाखल होण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते. रोज वणीच्या शासकीय मैदानावर येऊन सराव करायचा. मात्र या घटनेने सचिनचे स्वप्न मैदानावरच राहिले.