यात्रेची निविदा प्रक्रिया पुन्हा होणार..Tender process for Yatra will be repeated..
दणका..
वणी:- येथे दरवर्षी भरणाऱ्या रंगनाथस्वामी यात्रेची निविदा प्रक्रिया मॅनेज करीत या प्रक्रियेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत वरिष्ठांकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. या संबंधीची बातमी प्रसिद्ध होताच पालिका प्रशासनाने पुन्हा निविदा प्रक्रिया राबवित असल्याची नोटीस फलकावर लावली आहे.Tender process for Yatra will be repeated..
दरवर्षी रंगनाथस्वामी ची यात्रा भरते. देशभरातील व्यावसायिक येथे व्यवसाय थाटतात. या यात्रेच्या निविदा काढून माध्यमातून प्रकाशित करण्यात येतात. मात्र यावर्षी यात्रेत मनोरंजन पार्क व इतर निविदा सोयीनुसार काढून यात भ्रष्टाचार करीत विशिष्ट व्यक्तीसाठी खटाटोप केल्याची तक्रार विलास कालेकर, अफजल बेग यांनी वरीष्ठाकडे केली होती. यासंबंधीचे वृत्त संगिनी न्यूज पोर्टल वरून प्रकाशित होताच प्रशासनाने सदर निविदा प्रक्रिया पुन्हा करणार असल्याची नोटीस फलकावर लावली आहे. परिणामी इतर व्यावसायिकांना आता लिलावात भाग घेता येणार आहे. यात पालिकेच्या उत्पन्नात आणखी भर पडणार आहे. केवळ स्वतःचे हित जोपासून निविदा मॅनेज करण्याचे प्रकार येथे सुरू असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.Tender process for Yatra will be repeated..