अपघातात दोन युवक जागीच ठार Two youths died on the spot in the accident

0

 अपघातात दोन युवक जागीच ठार.

गणेशपूर जवळील घटना.

Sangini News



वणी:- मुकुटंबन पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या गणेशपूर(खडकी)जवळ दुचाकीने जाणाऱ्या दोघांचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्रीचे सुमारास घडली आहे.Two youths died on the spot in the accident.


तालुक्यातील मोहदा येथील गणेश कैलास टेकाम (१८) हा मित्र रोहित माणिक मरस्कोह्ले(तेजापूर)  या युवकासोबत तेजापूर कडे जात असताना त्यांचे दुचाकीवरून नियंत्रण सुटले आणि दोघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी रात्रीचे सुमारास घडली. बाजूला म्हैस मृत अवस्थेत असल्याची माहिती आहे. नेमका अपघात कशाने झाला हे अद्याप अस्पष्ट आहे. यात दोन्ही मृत युवक रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यात पडून होते. मुकुटंबन पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वणीच्या ग्रामीण रुग्णालयात पाठविले आहे. तूर्तास या घटनेचा तपास मुकुटंबन पोलीस करीत आहे.Two youths died on the spot in the accident.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top