रंगनाथ स्वामी यात्रेची निविदा मॅनेज अर्जदाराचा गंभिर आरोप

0

 रंगनाथ स्वामी यात्रेची निविदा मॅनेज.
अर्जदाराचा गंभिर आरोप

रंगनाथ स्वामी यात्रेची निविदा मॅनेज.  अर्जदाराचा गंभिर आरोप
वणीः- वणी येथे दरवर्षी भरणा-या रंगनाथ स्वामी यात्रेत देशातील विविध भागातून व्यावसाईक येतात. या यात्रेची निविदा वृत्तपत्रांमधून प्रकाशित केल्या जाते मात्र नगर पालीका प्रशासनाने केवळ कमी अंक येणा-या एका वृत्तपत्रात निविदा जाहिरात दिल्याने सदर कंत्राट निविदा मॅनेज करून दिल्याची तक्रार जगदंबा अॅम्युजमेंट कंपनीच्या वतिने विलास कालेकर यांनी वरिष्ठांकडे केली आहे.Ranganath Swami Yatra Tender Manage. Serious allegation of the applicant



वणीची रंगनाथ स्वामी जत्रा प्रसिध्द आहे. या जत्रेत मोठा बैलबाजार भरतो. देशातील विविध भागातील व्यावसाईक येथे व्यवसाय करण्यासाठी येतात. मागील काही काळापासून वणीची जत्रा लोप पावत चालली आहेेे. येथे मिनी बाजार आकाश पाळणा, ब्रेक डाॅन्स झुला, सलांबो झुला, ड्रॅगन ड्रोन, नावडी झुला, टोराटोरा झुला, मौत का कुआ आणि इतर लहान मुलांचे झुले तथा दुकाने लावण्यात येतात. यासंबंधीची कंत्राट निविदा नगर पालीका प्रशासन वृत्तपत्रातून प्रकाशित करते. त्याच आधारे देशातील विविध ठिकाणचे व्यावसाईक कंत्राट घेतात. परंतू या वर्षी नगर पालीकेत प्रशासकीय अधिकारी आहेत.

रंगनाथ स्वामी यात्रेची कंत्राट निविदा अनेक वृत्तपत्रातून प्रसिध्द करणे अनिवार्य असतांना केवळ अगदी बोटावर मोजण्याइतके अंक येणा-या वृत्तपत्रातून निविदा प्रसिध्द केली आहे. परिणामी जत्रेत येणा-या व्यावासाईकांना कोणहीही माहिती मिळाली नाही. त्यामुळे सदर निविदा नगर पालीका प्रशासनाने मॅनेज करून एकाच कुटूंबातील सदस्यांना कंत्राट दिल्याची कुणकुण असल्याची तक्रार जगदंबा अॅम्युजमेंट कंपनीच्या वतिने विलास कालेकर यांनी वरिष्ठांकडे केली आहे. यात नगर पालिकेने फलकावर जाहिरात न लावता केवळ एका वृत्तपत्रातून जाहिरात प्रसिध्द केली आहे. सदर कंत्राटाची माहिती कोणालाही कळू नये याची पूर्ण खबरदारी प्रशासनाने घेतली आहे. तसेच यासंबधी कालेकर यांनी 12 जानेवारीला वणी नगर पालिकेला पत्र सुध्दा दिले आहे. वारंवार मुख्याधिकारी यांची भेट सुध्दा घेतली आहे. यासंबधीची कंत्राट निविदा कधी निघणार याबाबत वारंवार विचारणा केली असल्याचे कालेकार यांनी तक्रारीत नमद केले आहे.सदर कंत्राट निविदा पुरेपूर मॅनेज केली असल्याचा आरोप तक्रारीतून केला आहे. यासंबधी मुख्याधिकारी यांना भ्रमणध्वणीवरूण संपर्क केला असता त्यांनी नंतर कळवितो असे सांगीतले.Ranganath Swami Yatra Tender Manage. Serious allegation of the applicant


पुन्हा निविदा काढून प्रकाशित करावी.


रंगनाथ स्वामी जत्रेचे कंत्राट पूर्णता मॅनेज झाले असल्याने प्रशासनाने नुन्हा निविदा काढून प्रकाशित करावी. जेणेकरून नगर पालिकेच्या उत्पन्नात वाढ होईल. अन्यथा सक्षम अधिका-याकडे तथा न्यायालयात दाद मागण्यात येईल. असा इशारा विलास कालेकर यांनी तक्रारीतून दिला आहे.



Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top