कर्जबाजारी शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या.
वणी:- मुकुटंबन पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या साखरा(दरा) येथील ४५ वर्षीय अल्पभूधारक शेतकऱ्याने कर्जबाजारीला कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली आहे.Indebted farmer commits suicide by consuming poison.
तालुक्यातील साखरा (दरा) येथील वासुदेव किसन नांदेकर या शेतकऱ्याकडे तीन एकर जमीन आहे. सततची नापिकी,डोक्यावर कर्जाचा डोंगर या विवंचनेत वासुदेव ने शनिवारी सकाळी लोणी(बोपापुर) शिवारात असलेल्या शेतात जाऊन विषारी द्रव्य प्राशन केले. या घटनेची माहिती मिळताच शेजाऱ्यांनी त्याला वणीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र डॉक्टरांनी वासुदेव ला मृत घोषित केल्याची माहिती आहे.Indebted farmer commits suicide by consuming poison.
तीन एकर शेतीत ओढत होता प्रपंचाचा गाडा
वासुदेव कडे तीन एकर शेती आहे. दोन मुली आहेत. दोघींचेही लग्न झालेले आहे. यातच सततची नापिकी, डोक्यावर बँक,तसेच इतर कर्ज सुद्धा होते. शेतमालाला भाव नाही. शासनाची मदत अद्यापही मिळाली नाही. यातच प्रपंचाचा गाडा चालवायचा कसा असा प्रश्न सातत्याने त्याच्या मनात येत असल्याने या अल्पभूधारक शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचलले असल्याची चर्चा आहे. Indebted farmer commits suicide by consuming poison.
पिकविम्या पासून शेतकरी वंचितच.
शासनाने पीकविमा देण्याचे आश्वासन दिले होते. विमा कंपन्यांचे लोक सर्वेक्षण करून गेले. मात्र पिकविम्याची रक्कम अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालीच नाही. हीच खरी शोकांतिका आहे. एकीकडे बँका वसुलीसाठी दारात उभ्या राहत आहेत. तर दुसरीकडे प्रपंच. असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहेत. अस्मानी संकटात सापडलेला शेतकरी आता सुलतानी संकटात आहे. मात्र शासन केवळ घोषणा करण्यात मग्न आहे. Indebted farmer commits suicide by consuming poison.