-->

पाण्यात बुडून युवतीचा मृत्यू Girl dies by drowning in water

0

पाण्यात बुडून युवतीचा मृत्यू Girl dies by drowning in water


Sangini News Wani Yavatmal

शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या मोहदा येथील इयत्ता नववीत शिक्षण घेत असलेल्या १५ वर्षीय युवतीचा गावालगत असलेल्या गिट्टी खाणीतील पाण्याने भरलेल्या खड्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना ४ एप्रिल गुरुवारी दुपारचे सुमारास घडली आहे.
Girl dies by drowning in water



Girl dies by drowning in water

पाण्यात बुडून युवतीचा मृत्यू 

तालुक्यातील मोहदा येथे मोठ्या प्रमाणात गिट्टीच्या खाणी आहेत. यातील बहुतांश खाणी बंद अवस्थेत आहे. परिणामी गिट्टी खणून त्या जागी मोठमोठे तळ्यासारखे खड्डे आहेत. त्या भरपूर प्रमाणात पाणी आहे. त्याच पाण्यात गावातील महिला कपडे धुण्यासाठी जातात.

गुरुवारी इयत्ता नववीत शिक्षण घेत असलेली विद्या अनिल आडे ही १५ वर्षीय युवती मैत्रिणीसह गिट्टी खाणीच्या जुन्या खड्डयात कपडे धुण्यासाठी गेली होती. कपडे धुत असतांना अचानक विद्याचा पाय घसरला अन ती खोल पाण्यात पडली. खड्डा जास्त खोल असल्याने विद्या पाण्यात बुडू लागली. सोबत असलेली मैत्रीण पुरती घाबरली. ती आरडाओरडा करायला लागली. जवळच असलेल्या लोकांनी खाणी कडे धाव घेतली. सोबत विद्याचे वडील सुद्धा होते. विद्या ला वाचविण्यासाठी लोकांनी पाण्यात उड्या मारल्या परंतु तोपर्यंत विद्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता.

पोलिसांना घटनेची माहिती

मोहदा येथील खाणीच्या खड्यात पडून १५ वर्षीय युवतीचा मृत्यू झाल्याची माहिती ग्रामस्थांनी शिरपूर पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करून विद्याचा मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी वणीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला होता.

त्यानंतर मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला होता.

बंद खाणी देताहेत मृत्यूला निमंत्रण


वणी उपविभागात मोहदा,नरसाळा, वांजरी येथील बहुतांश गिट्टीच्या खाणी बंद अवस्थेत आहेत. नियमांचे उल्लंघन करीत खड्डे जैसे थे च आहेत. परिणामी अशा घटना घडून जीवितहानी होत आहे. या प्रकाराला प्रशासन आणि खाण मालक जबाबदार असल्याचे आरोप होताना दिसते आहे. या गंभीर प्रश्नाकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top