-->

दामले फैलातील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

0


Sangini News Wani


वणी पोलिसांच्या हद्दीत येणाऱ्या दामले फैलातील ३६ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवार २३ एप्रिलच्या दुपारी घडली आहे.A young man committed suicide by hanging himself in Damle Fail
दामले फैलातील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या


दामले फैलातील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

शहरातील दामले फैलातील मनोज भाऊराव उंदिरवाडे हा मजुरीचे काम करीत होता. मंगळवारी दुपारी घरी कोणी नसतांना त्याने घराच्या आड्याला असलेल्या लाकडी फळीवर दोरीने गळफास लावला. मनोज चा मोठा मुलगा घरी आला असता त्याला वडील गळफास घेऊन असल्याचे दिसताच त्याने लगतच असलेल्या आजोबांकडे धाव घेतली. परिसरातील लोकांनी मनोज ला खाली उतरवून ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले होते. मनोज रोजमजुरी करून कुटुंबाचा गाडा चालवीत होता. त्याच्या पश्चात पत्नी,दोन मुले, आहेत. वडिलांचे घर शेजारीच आहे. दिवसेंदिवस आत्महत्यांचे प्रमाणात सातत्याने वाढ होतांना दिसते आहे. पुढील तपास वणी पोलीस करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top