-->

खैरगाव फाट्याजवळ कार जळून खाक

0

खैरगाव फाट्याजवळ कार जळून खाक 


Sangini News Wani


    मारेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या बोटोनी खंडणी मार्गावरील खैरगाव फाट्याजवळ धावत्या कार ने अचानक पेट घेतला. या आगीत कार जागीच जळून खाक झाली. चालकाच्या सातर्कतेने सुदैवाने जीवितहानी मात्र झाली नसल्याची घटना मंगळवार २३ एप्रिल ला दुपारी १२ वाजताचे सुमारास घडली आहे.Car burnt near Khairgaon Phata

खैरगाव फाट्याजवळ कार जळून खाक The burning car



     पवन नक्षणे हे परिवारासह बोटोनी वरून आपल्या खंडणी गावाकडे एम. एच.34 एफ 3898 या मारुती कारने परतीचा प्रवास करीत होते. दरम्यान बोटोनी गावापासून काही अंतरावर असलेल्या बोटोनी ते खंडणी मार्गांवरील खैरगांव फाट्या जवळ त्यांच्या कार ने अचानक पेट घेतला. हीं बाब कार चालकाच्या लक्षात येताच त्याने सतर्कता दाखवीत कार मध्ये बसलेल्या सर्वांना बाहेर काढले. परिणामी अनर्थ टळला. पवन नक्षणे हे पत्नी आणि दीड वर्षाच्या बाळा सह बोटोनी botoni येथून खंडणी कडे जात असताना हीं दुर्दैवी घटना घडली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. कार मात्र बेचिराख झाली होती. सध्या ऊन लाही लाही करीत आहे. यातच वाहनाचे तापमान वाढते आहे. परिणामी अशा घटना उघडकीस येतांना दिसते आहे.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top