-->

धानोरकरांनी यांना पत्रकारांसाठी खरंच पैसे दिले काय?

0

धानोरकरांनी यांना पत्रकारांसाठी खरंच पैसे दिले काय?


Sangini News Wani


नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मारेगाव तालुक्यातील काँग्रेसच्या तीन पदाधिकाऱ्यांनी उमेदवारांकडून पैसे घेऊन ते पैसे पत्रकारांना दिले नसल्याचे खळबळजनक वृत्त वर्धा येथून प्रकाशित होणाऱ्या एका वृत्तपत्राने प्रकाशित केले होते. त्यावर मारेगाव तालुका काँग्रेस सेवादल, तालुका अध्यक्ष, व शहर अध्यक्षांनी सदरबदनामीकारक वृत्त प्रकाशित केले असल्याने संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी वरिष्ठांकडे केली आहे.Did Dhanorkar really pay him for journalists?
धानोरकरांनी यांना पत्रकारांसाठी खरंच पैसे दिले काय?




चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्रात इंडिया आघाडीच्या आ. प्रतिभा धानोरकर व भाजपचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यात थेट लढत होती. देशाचे संविधान व ,वाढती महागाई, आणि बेरोजगारी या प्रश्नावर काँग्रेस ने नव्हे तर जनतेने लढा उभारला होता. मात्र यात काँग्रेसचे नेते ,पुढारी चांगलेच मिरवीत होते.इंडिया आघाडीतील घटक पक्षांनी तण, मन,धन वापरून देशाचे संविधान व समस्या डोळ्यासमोर ठेऊन काँग्रेस पक्षाच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांना निवडून आणण्यासाठी सर्वोतोपरी मदत केली. मात्र यात उमेदवार अनभिज्ञ राहिले. केवळ काँग्रेस च्या पदाधिकाऱ्यावर भरोसा ठेवीत घटक पक्षांना दुय्यम स्थान दिले गेले हे वास्तव आहे.
निवडणूक होती ती वाढती महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांना मिळणारे अत्यल्प शेतमाल भाव. आणि अनाठायी कर यावर ही लढाई जनतेने हातात घेतली होती. यासाठी वणी विधानसभा मतदारसंघात तर काँग्रेस पेक्षा घटक पक्ष पुढे होते हे त्रिवार सत्य आहे. म्हणजेच खेड्यातून शहरात लाट आली हाच या निवडणुकीचा प्रत्यय आहे. 
यातच वर्धा येथून प्रकाशित होणाऱ्या वृत्तपत्राने एक खळबजनक बातमी प्रकाशित केली. यात काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे नावे घेऊन पत्रकारांना पैसे देण्यात येणार होते ते पदाधिकाऱ्यांनी परस्पर हडप केल्याचे नमूद केले आहे.
यावर मारेगाव तालुका अध्यक्ष, मारोती गौरकार,शहर अध्यक्ष तथा सेवादल अध्यक्ष नांदेश्वर आसुटकर,वसंत जिनिंग संचाकल अंकुश माफुर यांनी आक्षेप घेत तहसीलदार, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन सादर करीत संबंधित वृत्तपत्रकाचे संपादक यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.

आधार नसतांना खोटे वृत्त


कोणताही आधार नसतांना सदर वृत्तपत्राने खोटे वृत्त प्रकाशित करून समाजात प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला आहे. जर या वृत्तपत्राच्या संपादक यांचे विरुद्ध कोणतीही कारवाई न केल्यास. याविरुद्धआंदोलन छेडण्याचा इशारा काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
धानोरकरांनी यांना पत्रकारांसाठी खरंच पैसे दिले काय?

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top