-->

Breaking पटवारी कॉलनीतील घरात सशस्त्र दरोडा Armed robbery at a house in Patwari Colony

0

पटवारी कॉलनीतील घरात सशस्त्र दरोडा Armed robbery at a house in Patwari Colony


Sangini News (Ravi Dhumne)

Wani-Yavatmal/:-
पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या पटवारी कॉलनीतील घरात कुटुंबातील तिघांना शस्त्राचा धाक दाखवून १७ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व दस्तऐवज लुटून दरोडा टाकल्याची घटना शुक्रवारी रात्री अडीच वाजताचे सुमारास उघडकीस आली आहे.

पटवारी कॉलनीतील घरात सशस्त्र दरोडा  Armed robbery at a house in Patwari Colony





शहराबाहेर असलेल्या लालगुडा ग्रामपंचायत चे हद्दीत येणाऱ्या पटवारी कॉलनीतील सुभाष वासुदेव पिदूरकर हे पत्नी,मुलगी सह राहतात. गुरुवारी रात्री जेवण करून ते बेडरूममध्ये झोपायला गेले. शुक्रवारी रात्री अडीच वाजताचे सुमारास पाच दरोडेखोरांनी घराचे दाराला असलेले कुलूप तोडून घरात प्रवेश केला. पिदूरकर कुटुंब बेडरूममध्ये असल्याने त्यांना कसलाही आवाज आला नाही. दरोडेखोरांनी थेट बेडरूममध्ये प्रवेश केला. आणि झोपलेल्या सुभाष पिदूरकर यांच्या गळ्यावर तलवार ठेवत घरात असलेले दागिने ,पैसे याबाबत माहिती विचारायला सुरुवात केली. पिदूरकर यांनी माहीत नसल्याचे सांगताच दरोडेखोरांनी मुलीला व पिदूरकर यांना शास्त्राचा धाक दाखवत ठेवत पत्नीला विचारपूस केली. शेवटी घाबरलेल्या महिलेने त्यांना कपाट दाखविले आणि दरोडेखोरांनी डाव साधला.

१७ तोळे वजनाचे दागिने व दस्तऐवज लुटून पोबारा

दरोडेखोरांनी पिदूरकर यांच्या घरातील कपाटात असलेले जवळपास १७ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, यात सोन्याची पोत, सोन्याचा हार,गोफ,अंगठ्या, कानातील डुल व सर्व पॉलिसी चे व मुलगी शिक्षिका असल्याने तिच्या विद्यार्थ्याचे पेपर घरातील सर्वांच्या  गळ्यावर शस्त्र ठेवत साहित्य घेऊन पोबारा केला आहे.

पोलीस घटनास्थळी दाखल

दरोडा पडल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी शहरात शोध मोहीम राबवली खरी मात्र अपयशी ठरले. सकाळी सुभाष पिदूरकर यांनी पोलीस ठाण्यात येऊन सदर घटनेची तक्रार नोंदवली होती.

पोलिसांचा वचकच उरला नाही

गेल्या दोन महिन्यांत चोरी घरफोडीच्या घटना वारंवार होत आहे. यात एकाही घटनेचा अद्याप पोलिसांना थांगपत्ता लागलेला नाही. भरदिवसा घरफोड्या झाल्या मात्र चोरांना पकडण्यात पोलिसांना यश आले नाही हे विशेष! परिणामी वणी शहरात पोलिसांचा वचकच उरला नाही हे यावरून स्पष्ट होते आहे.

पटवारी कॉलनीतून दोन दुचाक्यांची चोरी

सुभाष पिदूरकर यांचे घरी दरोडा पडण्याआधी त्याच भागात राहणाऱ्या व्यक्तींच्या घरासमोर उभ्या असलेल्या दुचाकी चोरून नेल्याची घटना त्याच रात्री एक वाजून ३४ मिनिटांनी नेल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. लुकेश कोहळे या व्यक्तीची पॅशन दुचाकी व अन्य एकाची यामाहा दुचाकी लंपास केली. लुकेशच्या घरासमोर बुलेट व पॅशन ठेऊन होती यातील पॅशन दुचाकी घेऊन गेले व त्यानंतर सुभाष पिदूरकर यांचे घरी दरोडा टाकल्याची माहिती मिळाली आहे.

चुगलीखोरांमुळे ठाण्याची लक्तरे वेशीवर

सध्या वणी ठाण्यात चुगलीखोरांची संख्या जास्तच झाली आहे. परिणामी कर्तव्यात अग्रेसर असलेले कर्मचारी मागे पडतांना दिसते आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता लागू आहे. मात्र येथे गेल्या कित्येक वर्षांपासून महत्वाची जबाबदारी सांभाळणारा हेड मोहरर तर प्रशासनाला स्वतःची माहिती पुरवीत नसल्याचे बोलल्या जात आहे. साहेबांच्या मागेपुढे करून अवाजवी माहिती देत असल्याने ठाण्याची लक्तरे वेशीला टांगल्या जात असल्याचे दिसून येत आहे. यातच प्रशासनाला माहिती न देता स्वतःची माहिती दडवून ठेवणाऱ्या विरुद्ध वरिष्ठांनी कारवाई करणे गरजेचे आहे. एकूणच वणी ठाण्यातच आदर्श आचारसंहितेचा फज्जा उडाला असल्याचे गेल्या कित्येक वर्षांपासून एकाच ठिकाणी ठाण मांडून बसणाऱ्या कर्मचाऱ्याच्या नियुक्तीवरून लक्षात येते आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top