-->

इंडिया आघाडीच्या उमेदवार धानोरकरांच्या प्रचाराला भांदेवाडा येथून सुरुवात

0

इंडिया आघाडीच्या उमेदवार धानोरकरांच्या प्रचाराला भांदेवाडा येथून सुरुवात

Wani Sangini News/
इंडिया आघाडीचा उमेदवार प्रतिभा धानोरकर यांचा राजूर सर्कल मधील जगन्नाथ देवस्थान भांदेवाडा येथे नारळ फोडून प्रचारास सुरुवात केली आहे. इंडिया आघाडीतील घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांनी बैठक घेऊन प्रचाराची धुरा सांभाळली आहे.

इंडिया आघाडीच्या उमेदवार धानोरकरांच्या प्रचाराला भांदेवाडा येथून सुरुवात

वणी तालुक्यातील राजूर कॉलरी येथे ४ एप्रिल ला राजूर येथील इंटक कामगार युनियन ऑफिस मध्ये राजूर सर्कल मधील इंडिया आघाडीतल्या घटक पक्षांची बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत प्रचाराचे नियोजन करण्यात आले होते. त्या अनुषंगाने ५ एप्रिल रोजी भांदेवाडा येथील जय जगन्नाथ देवस्थान येथे जाऊन इंडिया आघाडीतील स्थानिक नेत्यांनी नारळ फोडून रीतसर प्रचाराला सुरुवात केली आहे.The campaign of India Aghadi candidate Dhanorkar has started from Bhandewada

प्रसंगी भांदेवाडा येथील काही ग्रामस्थांशी संवाद साधण्यात आला. देशातील मूठभर भांडवलदारांना देशाची साधने अर्पण करून देशातील सार्वजनिक उद्योग भाजपचा मोदी सरकारने विकली, त्याच सोबत १९ लाख कोटी रुपयांचे भांडवलदारांचे कर्जे माफ केली, ८३ % बेरोजगारी वाढविली, महिलांवरील अत्याचारांना पाठीशी घातले, मणिपूर येथील आदिवासी वर होणारे अत्याचार थांबवण्यास मोदी सरकार अयशस्वी ठरले, लद्दाक येथील स्थानिक जनता संविधानाचे ६ व्या अनुसुचीची अंमलबजावणी करण्यासाठी आंदोलन करीत असताना त्याला दुर्लक्ष केले, असंविधानिक निवडणूक रोख्या च्या माध्यमातून देशात बोगस लोकांना खैरात वाटून करोडो रुपयांचा निधी उकळून प्रचंड कधी नव्हे एवढा भ्रष्टाचार भाजपचा मोदी सरकारने केला आहे. भाजपने इडी, सीबीआय व आयकर ह्या स्वायत्त संस्थेचा गैरवापर करून विरोधकांना भीती दाखवून भ्रष्टाचाऱ्यांना आपल्या पक्षात घेऊन भेदाभेद करून त्यांची प्रकरणे संपविली तर जे यांचा भीती पुढे मान झुकविली नाही त्यांना तुरुंगात टाकले, हे सर्व मुद्दे ह्या प्रचारात घेऊन देशात मोदी सरकारचे रूपाने असलेली हुकूमशाही संपविण्यासाठी, लोकशाही, संविधान वाचविण्यासाठी इंडिया आघाडीचा प्रतिभा यांना निवडून देण्याचे आवाहन करण्यात आले.

प्रसंगी काँग्रेसचे डेनी संड्रावार, वसुंधरा गजभिये, रमेश देवतळे, चेतन देवतळे,महादेव तेडेवार, महाकाली पामुलवार, डेव्हिड पेरकावार, माकपचे कॉ. कुमार मोहरमपुरी, शिवसेनेचे नितीन मिलमिले आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top