-->

घरावर चढून ताडपत्री झाकतांना इसमाचा मृत्यू

0


Sangini News Wani


वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या राजूर(इजारा) येथील ६५ वर्षीय इसमाचा घरावर चढून ताडपत्री झाकत असतांना मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सायंकाळचे सुमारास उघडकीस आली आहे. Old man died while covering the house with tarpaulin
घरावर चढून ताडपत्री झाकतांना इसमाचा मृत्यू


घरावर चढून ताडपत्री झाकतांना इसमाचा मृत्यू
तालुक्यातील राजूर इजारा येथील रामभाऊ कोहळे हे घराजवळ असलेल्या खुल्या जागेवर भाजीपाला पीक काढून तो विकून उदरनिर्वाह करीत होते. सोमवारी अचानक आकाशात ढग दाटून आले. अन वादळाला सुरुवात झाली. तत्पूर्वी ते घरात पाणी येऊ नये यासाठी घरावर चढून ताडपत्री टाकत असतांना त्यांचा मृत्यू झाला आहे. ताडपत्री झाकत असतांना अचानक हृदयविकाराचा झटका आला असल्याची प्राथमिक माहिती आहे.

सोमवारी सायंकाळी वणी परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली होती. यात अनेकांचे टिनाचे पत्रे देखील वादळात उडाले. काहींचे शेड तर तुटून पडले. सोमवारच्या वादळात अनेकांचे नुकसान झाले आहे. अवकाळी पाऊस थांबता थांबेना असा झाला आहे. कित्येकांच्या मंगल कार्यात अडथळा निर्माण होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top