-->

रासा येथील शेतकऱ्याच्या शेतातून मिरची लंपास Chili lumpas from a farmer's farm in Rasa.

0

रासा येथील शेतकऱ्याच्या शेतातून मिरची लंपास

शेतकरी हवालदिल

     वणी /  पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या रासा येथील शेत शिवारातील बंड्यातून चोरट्यानी कुलूप तोडून मिरची लंपास केल्याची घटना घडली आहे. मात्र अद्यापही पोलिसांनी कोणताही तपास केला नसल्याचा आरोप शेतकऱ्याने केला आहे.Chili lumpas from a farmer's farm in Rasa.

रासा येथील शेतकऱ्याच्या शेतातून मिरची लंपास
रासा येथील शेतकऱ्याच्या शेतातून मिरची लंपास



    तालुक्यातील रासा शेत शिवारात पेट्रोल पंप पासून अवघ्या अर्धा किलोमीटर अंतरावर भारत शंकर कुमरे या शेतकऱ्याचे शेत आहे. शेतात साहित्य ठेवण्यासाठी बंडा बांधण्यात आला आहे. सदर शेतकऱ्याने ऑगस्ट महिन्यात मिरची लागवड केली होती. त्यानंतर मिरची तोडून बंड्यात साठवून ठेवली होती. नेहमीप्रमाणे भारत कुमरे शेतात गेले असता त्यांना बंड्याचे कुलूप तुटून पडलेले दिसले. बंड्याच्या आत प्रवेश केल्यानंतर बंड्यात ठेवलेली सहा पोते मिरची चोरी गेल्याचे लक्षात आले. लागलीच त्यांनी रासा येथील सरपंच यांना तक्रार दिली. पोलीस पाटील नसल्याने थेट पोलीस ठाणे गाठून तीच तक्रार ठाण्यात दाखल केली. 
     मात्र पोलिसांनी यावर कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. शेतकऱ्याच्या मते मिरची चोर गावातील असल्याची शंका व्यक्त केली आहे.

राबराब राबून हाती आलेला शेतमाल चोरटे लंपास करीत आहे. परिणामी आधीच सुल्तानी आणि अस्मानी संकटात सापडलेला शेतकरी मात्र हवालदिल झाला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top