Sangini News Wani
माजरी(चंद्रपूर) पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या पाटाळा गावाजवळील राळेगाव फाट्यावर डीझल घेण्याचे बहाण्याने बोलावून पाटाळा येथील तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला करून हल्लेखोर पसार झाला होता. पोलिसांनी त्याला हुडकून राजूर येथून ताब्यात घेतले आहे. गंभीर जखमी असलेल्या तरुणाच्या बहिणीचे रविवारीच लग्न होते. त्याआधीच त्याच्यावर हल्ला करण्यात आला हे विशेष!Attack on brother before sister's marriage.
बहिणीच्या लग्नाआधीच भावावर हल्ला.
पाटाळा येथील धीरज घनवडे (२२) या तरुणाच्या बहिणीचे लग्न २८ एप्रिल रविवारला होते. शुक्रवारी धीरज लग्नाच्या धामधुमीत होता. घरातील कामे, हवे नको ते आणणे अशी कामे करीत असताना अचानक त्याला फोन आला. आणि डीझल हवे असे सांगण्यात आले. धीरज घरातील कामे सोडून पाटाळा पुलालगत असलेल्या राळेगाव फाट्यावरील जगन्नाथ मंदिराजवळ पोहचला. तत्पूर्वी ज्याने फोन केला तो आधीच तेथे थांबला होता. धीरज येताच त्याने धिरजवर सपासप वार केले आणि पळून गेला. यात धीरज च्या मानेवर पोटात गंभीर दुखापत झाली होती. धीरज रक्तबंबाळ अवस्थेत होता. ही बाब नारायण मारकर याने कुटुंबियांना सांगितली तसेच ग्रामस्थांना कळताच त्यांनी धाव घेतली. प्रथम धीरज ला वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.मात्र धीरज ची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला चंद्रपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. प्रसंगी धीरज च्या शरीरातून रक्त खूप जात होते.
हल्लेखोराचा शोध आणि वणी हद्दीतील हल्लेखोर
धीरज घरी असतांना त्याला डीझल घेण्याचे बहाण्याने बोलविणारा राजूर कॉलरी येथील वेदांत हिकरे, व त्याचा मित्र प्रज्वल शेंडे हे दोघे मिळून आले होते. दरम्यान वेदांत ने प्रज्वल ला काही साहित्य आणण्यासाठी पाठवले. आणि धीरज येताच त्याने सपासप चाकूने वार केले. प्रज्वल गंभीर जखमी झाला होता. रक्तबंबाळ अवस्थेत बघून हल्लेखोर पसार झाले. आणि पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी शोधमोहीम सुरू केली. प्रथम धीरज चा मोबाईल तपासून आलेल्या कॉल ची पडताळणी केली. त्यात वेदांत चा शेवटचा क्रमांक होता. लागलीच पोलिसांनी शोध घेत वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या राजूर कॉलरी येथे जाऊन शोध घेतला आणि वेदांत हिकरे याला ताब्यात घेतले.
ऐन बहिणीच्या लग्नाच्या आधीच भावाचा गेम करण्याच्या डावाचे कारण काय?
धीरज च्या बहिणीचे लग्न रविवारी होणार होते. शनिवारी हळदीचा कार्यक्रम होणार होता. अन त्याआधीच धीरज ला डीझल च्या बहाण्याने बोलावून संपविण्याचा कट तर नसेल ना? असे अनेक प्रश्न उपस्थित होतांना दिसले. उपविभागीय पोलीस अधिकारी नयोमी साटम ,ठाणेदार, फॉरेन्सिक चमू घटनास्थळी दाखल झाले होते. पुढील तपास माजरी पोलीस करीत आहे.

.jpg)