त्या चौकीदाराचा कोणी केला खून? Who killed the watchman?
Sangini News Wani /:-
वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या पळसोनी फाट्यावर असलेल्या गोदामात चौकीदार म्हणून काम करीत असलेल्या ६३ वर्षीय इसमाचा अज्ञातांनी खून केला असल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली आहे.Who killed the watchman?
पळसोनी फाट्यावरील घटना
पळसोनी फाट्या लगत असलेल्या गोदामात चौकीदार म्हणून कार्यरत असलेल्या आष्टोना येथील जीवन विठ्ठल झाडे हा पत्नीसह पळसोनी फाट्यावर असलेल्या सिमेंट गोदामात गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत होता. रविवारी त्यांची पत्नी आष्टोना या मूळ गावी गेली होती. त्याच रात्री लोखंड चोरणारे चोरटे पाळत ठेऊन होते. दरम्यान गोदामात व बाहेर असलेल्या लोखंडी सलाखी चोरून नेल्या. परत चोरी करीत असताना जीवन ला दिसला. तो दिसताच चोरट्यानी जीवनवर हल्ला केला. डोक्यावर जबरदस्त प्रहार केल्याने जीवन चा मृत्यू झाला. या घटनेची तक्रार योगेश ट्रेडर्स चे मालक सुरेश खिवंसरा यांनी पोलिसात दाखल केली होती.सीसीटीव्ही ची तोडफोड
चोरी करण्याआधी चोरट्यानी सीसीटीव्हीची तोडफोड केली होती. त्यानंतर लोखंडी रॉड एका वाहनात भरून नेले. घटनास्थळी कोणताही पुरावा मागे सोडला नाही. परिणामी त्या चोरट्यानी याआधी सुद्धा असे प्रकार केले असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
अधिकाऱ्यांची घटनास्थळी भेट
वणी पोलीस स्टेशन हद्दीत अनेक घटना घडत आहेत. घरफोडी, दरोडा,बाईक चोरी असे प्रकार नित्याचेच झाले आहे. याआधी झालेल्या घरफोडी व दरोड्याचे आरोपी अद्यापही पोलिसांना गवसले नाही. अन लागलीच ही दरोड्याची घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप,उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे वणी ठाणेदार अनिल बेहरानी,शिरपूर ठाणेदार माधव शिंदे पण पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले होते. आणि लगेच तपासाची चक्रे जोरात फिरू लागली.

.jpg)