-->

शिवकालीन मर्दानी शस्त्र विद्या शिबिराचे आयोजन...

0


Sangini News Wani


शिव आनंद व रॉयल फाऊंडेशन वणी च्या संयुक्त विद्यमाने लाठीकाठी, दांडपट्टा, तलवारबाजी, आदी मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिके तसेच उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले असुन 1 मे ते 26 जुन असे हे शिबीर चालणार असुन प्रशिक्षक म्हणून युवा तेजस्विनी गव्हाणे असणार आहे. (Organized Shivkalin Mardani Shastra Vidya Camp..)
शिवकालीन मर्दानी शस्त्र विद्या शिबिराचे आयोजन


रंगणार चित्तथरारक प्रात्यक्षिके :- युवा प्रशिक्षक तेजु गव्हाणे करणार नेतृत्व..

प्रत्येक महिला व पुरुषात बचावाचे असे काही मर्दानी गुण असणे काळाची गरज असुन आजच्या आधुनिक युगात असे मर्दानी खेळ लुप्त होत चाललेआहे. शिव आनंद व रॉयल फाऊंडेशन वणीच्या च्या संयुक्त विद्यमाने शहरातील विद्यार्थ्यां मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करणे ...तसेच यातुन महिला सक्षम झाली पाहिजे, पुढची महिला ही सुदृढ व सक्षम असली पाहिजे, तिला संघर्षाशी लढता आले पाहिजे असे विविध उद्देश आहे. मर्दानी खेळाचे प्रशिक्षण विशेष म्हणजे हे प्रशिक्षण एक महिला चिमुकली अवघ्या 10 व्या वर्गात शिकत असलेली कु. तेजस्वीनी राजू गव्हाणे प्रशिक्षण देत आहे, रोज या प्रशिक्षणात 80 ते 90 विद्यार्थी स्वसंरक्षणाचे धडे गिरविणार आहे. संध्याकाळी 4.00 ते 6.00 या कालावधीत आदर्श हायस्कुल वणी येथे हे प्रशिक्षण होणार आहे. अधिक माहितीकरिता राजु गव्हाणे 9764253253, विजु गव्हाणे 9822926480 यांच्याशी संपर्क करावा. शिबिराचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top