अग्निशस्त्र वापरणाऱ्यासह आयपीएल सट्टयावर एलसीबीची धाड
Sangini News Waniवणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या वागदरा परिसरात आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा घेणाऱ्या तिघांना एलसीबीच्या पथकाने एक लाख सहा हजार आठशे रुपयांच्या मुद्देमालासह ताब्यात घेतल्याची घटना मंगळवार १६ एप्रिल ला घडली आहे. तर जोडमोहा परिसरातील एका धाब्यावर गावठी पिस्टल बाळगणाऱ्या एकाला दोन काडतुस व पिस्टल सह ताब्यात घेतले आहे
.
.jpg)
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला जिल्ह्यात सुरू असलेल्या गुन्हेगारी व पसार आरोपी शोधणे यासाठी आदेशीत केले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक वॉरंट असलेले गुन्हेगार, यांच्या शोधात असतांना त्यांना मिळालेल्या माहितीनुसार जोडमोहा परिसरातील मामा च्या धाबा परिसरात एक इसम बनावट पिस्टल घेऊन फिरत असल्याच्या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संशयास्पद स्थितीत फिरत असलेल्या गजानन भाऊराव गायकवाड ४६ विदर्भ हाऊसिंग सोसायटी यवतमाळ याला ५० हजार रुपये किमतीचे बनावट पिस्टल व चारशे रुपयांच्या दोन काडतुस सह ताब्यात घेऊन कारवाई केली आहे.
वणीत आयपीएल क्रिकेट सट्टा चालविणारे तिघे ताब्यात
यवतमाळ येथील बनावट पिस्टल घेऊन फिरणाऱ्या इसमाला अटक करून ग्रामीण पोलीस स्टेशन यवतमाळ यांच्या ताब्यात देऊन. यातील पथक वणी परिसरात फिरत असतांना वागदरा परिसरात असलेल्या हनुमान मंदिर परिसरात आयपीएल सिजन १७ के ले आर विरुद्ध राजस्थान रॉयल यांच्यात होणाऱ्या सामन्यावर बेटिंग जुगार खेळ मोबाईल द्वारे खेळवीत असल्याचे माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकली असता मोबाईलवर आयपीएल सट्टा खेळविणाऱ्या मधुकर तात्याजी पारखी ३८ रामपुरा वॉर्ड वणी, अरविंद जनार्दन गोहोकार ३९, शास्त्रीनगर ,व आशिष रमेश मेश्राम २२ रामपुरा वॉर्ड या तिघांना पाच मोबाईल फोन, चार हजार आठशे रुपये नगदी व एक दुचाकी असा एकूण एक लाख सहा हजार आठशे रुपयांच्या मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ पवन बनसोड, अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप , स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आधारसिंग सोनोने यांच्या मार्गदर्शनाखालीसहायक पोलिस निरीक्षक,विवेक देशमुख, सपोनि अमोल मुडे,पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर कांडुरे,पोलीस उपनिरीक्षकधनराज हाके,अंमलदार सैय्यद साजिद, अजय डोळे,ऋतुराजमेडवे,रुपेश पाली,निलेश राठोड,योगेश टेकाम,सुनील खंडागळे,सुधीर पांडे,सुधीर पिदूरकर,रजनीकांत मडावी आदींनी केली आहे.
