-->

घरगुती गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण

0


Sangini News Wani


घरगूती गणपतीची स्थापना बहुतांश घरामध्ये केल्या जाते. यात सजावट,सुद्धा करण्यात येते. बाप्पाच्या स्थापनेत पर्यावरणपूरक आकर्षक देखाव्यांना चालना देण्यासाठी तिरुमल्ला तिरुपती क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी,पोलीस स्टेशन वणी,संस्कार भारती समिती वणीच्या वतीने पर्यावरण पूरक सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान या स्पर्धेत सहभागी झालेल्या लोकांना बक्षीस वितरण करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
घरगुती गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण



या स्पर्धेत एकशे ६७ गणेशभक्तांनी सहभाग घेतला होता. सदर स्पर्धा वणी, लालगुडा, वागदरा, गणेशपुर व चिखलगाव येथील गणेश भक्तांसाठी आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचे बक्षीस वितरण जैताई देवस्थान येथे पोलीस निरीक्षक अनिल बेहरानी, जैताई देवस्थान चे अध्यक्ष माधव सरपटवार, संस्कार भारती समिती वणीच्या अध्यक्षा रजनी पोयाम, मुन्ना महाराज व पारसमल चोरडिया फाऊंडेशन चे ऍड. कुणाल चोरडिया यांच्या हस्ते देण्यात आले.Prize Distribution of Home Ganpati Decoration Competition

प्रथम बक्षीस वैशाली वातीले, द्वितीय बक्षीस सुमित ठाकूर, नितेश झट्टे व तृतीय बक्षीस स्वप्नील दहीवलकर, क्रीष्णा कोमरेड्डीवार तसेच प्रोत्साहन पर ऋषी राऊत, जयंत वाघमारे, निशा ढुमणे, कुणाल जंगीलवार, रोहित डवरे, टिकेश किन्हेकार यांनी प्राप्त केले. बक्षीस वितरण कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ अमृता अलोणे यांनी केले तर स्पर्धेच्या नियोजनासाठी तिरूमल्ला तिरुपती क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी, राकेश खामनकर, अभय पारखी, अतुल डफ, अमित उपाध्ये, शेखर वांढरे, सागर मुने यांनी परिश्रम घेतले.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top