-->

महाविकास आघाडीचा राजूर येथे झंझावती प्रचार Mahavikas Aghadi's Janjawati campaign at Rajur

0

Sangini News
Mahavikas Aghadi's Janjawati campaign at Rajur
वणी : इंडिया, महाविकास आघाडीचा लोकसभेचा उमेदवार प्रतिभा धानोरकर यांच्या निवडणूक प्रचाराला शेवटचा एक दिवस शिल्लक असताना तालुक्यातील सर्वात मोठे गाव ज्याला मिनी इंडिया म्हणून ओळखले जाते अश्या राजूर गावात आघाडीचे सर्वच घटक पक्षाचे नेते व कार्यकर्त्यांनी गावातील नागरिकांचा भेटी घेत इजारा येथे सभा घेतली. हुकूमशाही विरुद्ध लोकशाही अशी लढत असल्याने लोकशाही, संविधान व देश वाचविण्यासाठी प्रतिभा धानोरकर यांना निवडून आणण्याचे आवाहन करण्यात आले.


प्रचंड कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत गावातील सर्वांचा भेटी घेत इजारा येथे सभा


प्रचंड कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत गावातील सर्वांचा भेटी घेत इजारा येथे सभा


महाविकास आघाडीचे घटक पक्षातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विधानसभा पक्ष प्रमुख संजय देरकर, कांग्रेसचे डॅनी संड्रावार, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कुमार मोहरमपुरी, मो. असलम, डेव्हिड पेरकावार, महादेव तेडेवार, प्रवीण खानझोडे, माजी जि प सदस्य संघदीप भगत, बालाजी मिलमिले, राजू तुराणकर, गणेश मिलमिले, फैजल खान, रावबान उईके, प्रणिता असलम, दिशा फुलझेले, आदींचा प्रमुख उपस्थितीत गावातील प्रमुख मार्गाने महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांचा प्रचार करण्यात आला.
संजय देरकरांच्या नेतृत्वात कॉर्नर सभा

संजय देरकरांच्या नेतृत्वात कॉर्नर सभा


येथील वॉर्ड क्र. एक मध्ये संत गाडगेबाबा चौकात कॉर्नर सभा घेण्यात आली. "चंद्रपूर -वणी - आर्णी लोकसभा क्षेत्रात भाजपाच्या मंत्री असलेल्या व स्वतःला विकास पुरुष म्हणवून घेणाऱ्या उमेदवारा पुढे कांग्रेसच्या महिला उमेदवार प्रतिभा धानोरकर यांना जनतेचे प्रचंड समर्थन मिळत असल्याने भाजपाचा पायाखालची वाळू निसटत चालली आहे. परिणामी भाजप कडून भावा बहिणीच्या नात्याला कलंक लावणारे विधान केले जात आहे तर प्रचार करण्यासाठी अभिनेत्रीला आणावे लागत आहे. भाजपाचा जनविरोधी कार्यामुळे जनतेमध्ये भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न भाजप कडून केल्या जात आहे. सध्या भाजप कडे निवडणूक रोख्या द्वारे आलेल्या पैशाचा महापुरा मुळे कुठलेही गैरप्रकार करू शकतात, त्यामुळे जनतेने ह्यापासून सावध राहावे." असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे वणी विधानसभा प्रमुख संजय देरकर यांनी कॉर्नर सभेत दिला, तर कॉ. कुमार मोहरमपुरी यांनी, "भाजपाची सरकार ही शेतकरी विरोधी, कामगार विरोधी व महिला विरोधी आणि जगात सध्या युवकांची सर्वात जास्त संख्या असलेल्या देशात शिक्षित युवकच बेरोजगार असल्याने युवक विरोधी भाजप सरकारला सत्तेवरून बेदखल केले पाहिजे" असे आवाहन केले. प्रसंगी बालाजी मिलमिले, संघदीप भगत, संतोष माहुरे, डेव्हिड पेरकावार, प्रवीण खानझोडे, यांनीही सभेला संबोधित करून "हुकूमशाहीला घालवून लोकशाहीचा विजय करून धनबल भाजपापासून गाफिल न राहता सावध राहण्याची गरज आहे" असा इशारा दिला.
या राजूर गावातील प्रचाराला भाकपाचे कॉ. नंदकिशोर लोहकरे, राजूर विकास संघर्ष समितीचे जयंत कोयरे, व असंख्य गावकऱ्यांनीं सहभाग नोंदवीला होता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top