-->

बँक ऑफ महाराष्ट्र च्या शाखा व्यवस्थापकाने केली शेतकऱ्याची अवहेलना

0


Sangini News Wani


येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखा वणीचे व्यवस्थापक व कर्मचारी यांचे कडून ग्राहकांसोबत अरेरावी धोरण राबवून त्यांची पिळवणूक केल्या जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. चक्क शेतकऱ्याने कर्ज परतफेड करून देखील त्याला परतफेडीचे प्रमाणपत्र देण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ केली असल्याचा आरोप शेतकऱ्याने तक्रारीतून केला आहे.The branch manager of Bank of Maharashtra ignored the farmer
बँक ऑफ महाराष्ट्र च्या शाखा व्यवस्थापकाने केली शेतकऱ्याची अवहेलना


दिवसभर शेतकऱ्याला थांबवून दिले नाही, कर्ज परतफेडीचे प्रमाणपत्र

तालुक्यातील विठ्ठलनगर (विरकुंड) येथील शेतकरी कवडू कुइटे यांनी त्यांचे शेतावरील पीक कर्जाची परतफेड मागील दोन ते तीन महिन्यांपूर्वीच केली आहे. त्या कर्जा संदर्भात कर्ज परतफेड दाखला मिळावा यासाठी २२ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ११.३० वाजता रीतसर अर्ज केला होता. त्याअनुषंगाने सदर शेतकऱ्याला दुपारी ४ वाजता प्रमाणपत्र देण्याचे बँकेकडून सांगण्यात आले होते. दरम्यान सदर शेतकऱ्याने ४ वाजेपर्यंत वाट बघून सुद्धा सदर प्रमाणपत्र न मिळत असल्याने त्यांनी बँकेकडे प्रमाणपत्राची मागणी केली. परंतु त्यांना दुसऱ्या दिवशी येण्याचे सांगण्यात आले. दिवसभर शेतकऱ्यांना थांबवून त्यांना माघारी पाठविण्यात आले आहे. जेव्हा की कर्जाची परतफेड केली असताना त्यांना कर्ज परतफेड प्रमाणपत्र देणे बँकेची जबाबदारी होती. याबाबत शेतकऱ्याने त्यांचे नातेवाईकांना बँकेत बोलावले असता, बँकेचे कर्मचारी व व्यवस्थापक यांनी सुरळीत उत्तर न देता किंबहुना तक्रारीचे कोणतेही निवारण न करता त्यांचेशी हुज्जत घातली व अरेरावी करीत जणू अवहेलना केली असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. व या संबंधी वरिष्ठांकडे ऑनलाईन तक्रार देखील करण्यात आली आहे. दिवसेंदिवस शेतकऱ्यांची बँकेत पिळवणूक होतांना दिसत आहे. संबंधित व्यवस्थापकावर वरिष्ठांनी कारवाई करण्याची मागणी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top