Sangini News Wani Yavatmal
Gajanan committed suicide by hanging himself
शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या चिंचोली येथील ४२ वर्षीय इसमाने शेताच्या बांधावर असलेल्या वृक्षाला दुपट्याच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
गजानन ने केली गळफास लावून आत्महत्या
तालुक्यातील चिंचोली येथील गजानन विठूजी सातघरे हा इसम गुरुवारी रात्री गावालगत असलेल्या शेतात गेला आणि शेतात असलेल्या झाडाला जवळ असलेल्या दुपट्ट्याने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. ही बाब सकाळी कुटुंबियांना लक्षात येताच घटनास्थळी धाव घेतली. आणि शिरपूर पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व गजानन चा मृतदेह उत्तरीय तपासणी साठी वणीच्या ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला. ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करून गजानन चा मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आल्याची माहिती आहे. पुढील तपास शिरपूर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी गजानन सावसाकडे करीत आहेत. तालुक्यात आत्महत्येच्या घटनांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. यातच गजानन ने आत्महत्या करण्याचे कारणही अद्याप अस्पष्ट आहे.

