-->

४०० पार ची घोषणा महायुतीला महाराष्ट्रातून हद्दपार करणार काय?Will the announcement of 400 pars expel the Mahayuti from Maharashtra?

0

४०० पार ची घोषणा महायुतीला महाराष्ट्रातून हद्दपार करणार काय?


Sangini News


लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुतीने ४०० पार ची घोषणा केली अन जणू महाराष्ट्रात दोन्ही टप्प्यातील निवडणुकीत महायुती हद्दपार होईल की,काय? असे चित्र दिसायला लागले. यात महाविकास आघाडीने स्पष्ट जाहीरनामा प्रसिद्ध करून अनेकांची मने जिंकत सत्य दाखविण्याचा प्रयत्न केला. यात पहिल्या टप्प्यात पाच पैकी चार आणि एका जागेसाठी काट्याची लढत होणार असल्याचे मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त करतांना दिसत आहे.गेल्या दहा वर्षात सत्ता भोगणाऱ्यांनी जनतेसाठी काय केले असे अनेक प्रश्न निवडणूक काळात उपस्थित झाले आहेत.
४०० पार ची घोषणा महायुतीला महाराष्ट्रातून हद्दपार करणार काय?



वाढत्या महागाईवर सरकार बोलले नाही.


गेल्या दहा वर्षात महागाईचा भस्मासुर फोफावला आहे. यात सामान्य माणसाच्या खिशाला कर उखळून घेत कात्री लावली. घरातील स्वयंपाकाचा गॅस सिलिंडर ची किंमत चौपट झाली. पेट्रोल,डीझल चे दर गगनाला भिडले. बँकेत कमी रक्कम असणाऱ्यांना तर वेगळाच कर भरावा लागतो आहे. Will the announcement of 400 pars expel the Mahayuti from Maharashtra?


शेतकरी अस्मानी सह सुलतानी संकटात


गेल्या दहा वर्षांपूर्वी शेतमालाचे भाव होते. तेच भाव सध्या आहे. मात्र रासायनिक खतांच्या किंमतीत भरमसाठ वाढ झाली आहे. परिणामी या सरकारवर शेतकरी प्रचंड नाराज असल्याचे दिसून आले आहे. शेतमालाची निर्यातबंदी करून आयात धोरण स्वीकारल्याने शेतमालाला पिकवण्यासाठी लागणारा खर्च निघत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. एकीकडे मजुरीचे दर वाढले शेती औजारे, घरातील खर्च मुलींचे लग्न ,पोरांचे शिक्षण कसे करावे असे अनेक प्रश्न उपस्थित होतांना दिसले आहे.

बेरोजगारांची थट्टाच.


आईवडिलांनी काबाडकष्ट करून उच्च शिक्षण दिले. मात्र केवळ हातात डिग्री घेऊन मिरवण्या पलीकडे उच्चशिक्षित तरुणांच्या हाताला कामच नसल्याने प्रचंड रोष सरकारवर दिसून आला. शिक्षण घेऊन उपयोग काय? असे अनेक तरुण सांगताना दिसले.

१५ लाख अन गॅरंटी?

मागील काळात सत्तेत येण्याआधी जनतेच्या खात्यात १५ लाख रुपये जमा होईल. असे निक्षून सांगण्यात आले होते. काळा पैसा बाहेर काढून जनतेला देण्याची घोषणा सरकारने केली होती. मात्र या घोषणेने जणू जनतेच्या तोंडाला पाने पुसली असल्याचा रोष ही दिसून आला. मग आता ही गॅरंटी काय कामाची असे लोक बोलून दाखवत होते.

पूर्व विदर्भात सुपडा साफ?

राजकीय विश्लेषकांनी समाज माध्यमातून पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात झालेल्या निवडणुकीचे विश्लेषण करतांना धक्कादायक कल दिले आहेत. विदर्भातील पहिल्या टप्प्यात झालेल्या भंडारा-गोंदिया, चिमूर-गडचिरोली, चंद्रपूर, रामटेक मतदारसंघात काँग्रेसच्या विजयी होईल. आणि नागपूर मध्ये काट्याची लढत असल्याचे विश्लेषण केले आहे. मग चारशे पार ची घोषणा करणाऱ्यांची गॅरंटी येथेच अपयशी ठरत आहे.

महाराष्ट्रात महाविकास आघाडी ३०-३५ जागा जिंकण्याचा अंदाज?

महायुतीने ४०० पार ची घोषणा केली तिला महाराष्ट्रात सुरुंग लागत असल्याचे दिसून येत आहे. २०१९ मध्ये शिवसेना, भाजप,अपक्ष मिळून ४२ जागा मिळाल्या होत्या. त्यातील शिवसेना(उबाठा) गट यावेळी भाजप सोबत नाहीत. उलट पक्ष फोडून अजित पवार गट,शिंदे गट,मनसे आदींना एकत्र करून देखील त्यांना दोन आकडी जागा मिळवणे कठीण असल्याचे विश्लेषक सांगत आहे. उत्तर प्रदेश नंतर महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा आहेत. सरकार स्थापनेचे गणित महाराष्ट्रावर अवलंबून आहे. जर महाराष्ट्रात पीछेहाट होत असेल तर ४०० पार कुठून होईल. यात संविधान बदलण्याचे भाष्य अन ४०० पार ची घोषणा ही महायुतीच्या पथ्यावर पडणार की,काय असे चित्र दिसायला लागले आहे. एकूणच इतरही राज्यात इंडिया आघाडीचा जोर वाढल्याने २०० चा आकडा तर गाठणार का? असे राजकीय विश्लेषक सांगताना दिसते आहे. दोन टप्यात ही स्थिती तर उर्वरित टप्यात काय होईल. हे बघणे महत्वाचे आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top