वणीत पक्क्या बांधकामावर चालला बुलडोझर Bulldozer running on concrete construction in Wani
Sangini News
Wani-Yavatmal
वणी शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात असलेल्या अतिक्रमित जागेवर असलेल्या पक्क्या बांधकामावर बुलडोझर चालवीत बांधकामे तोडण्यात आली आहे. सदर जागेवर क्रीडा संकुल तयार होत असल्याने येथील अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केल्याची माहिती आहे.Bulldozer running on concrete construction in Wani
शहरातील वरोरा मार्गावर असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोरील भागात जिल्हा परिषदेची जागा आहे. त्या जागेवर क्रीडा संकुल तयार करण्याच्या दृष्टीने १६ मे पासून येथील अतिक्रमण हटविण्यासाठी तयारी सुरू आहे. संपूर्ण परिसरात जेसीबी च्या सहाय्याने झाडेझुडपे काढण्यात येत आहे. यातच या जागेवर अनेकांची पक्की घरे सुद्धा आहेत. सदर घरे ही बहुतांश वर्षांपासून येथे आहेत. लगतच वरोरा मार्गावर असलेल्या आशा बिअर बार, ज्योती बार यांचे बांधकाम सुद्धा काही प्रमाणात अतिक्रमित असल्याने त्यांच्या सुरक्षा भिंती सुद्धा पाडण्यात आल्या आहेत. पट्टाचारा नगर, भागात सुद्धा बुलडोझर चालविण्यात आला आहे. सदर जागेवर अतिक्रमण केलेली घरे सुद्धा पाडण्यात आली आहे. या जिल्हा परिषदेच्या जागेवर अद्यावत क्रीडा संकुल तयार करण्यात येणार असल्याने अतिक्रमण मोहीम सुरू करण्यात आली आहे. मात्र गेल्या कित्येक वर्षांपासून पक्की घरे बांधून वास्तव्यास असलेली कुटुंबे या मोहिमेने चिंतेत आहेत. झाडाझुडीत अडकलेली ही जिल्हा परिषदेची जागा आता मोकळी होतांना दिसत आहे.

.jpg)