घोंसा मार्गावर भरदिवसा चोरट्यानी ८० हजार लुटले Thieves robbed 80,000 in broad daylight on Ghonsa road
Sangini News Wani Yavatmal
वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या मारेगाव(कोरंबी) जवळील विद्यालय परिसरात किराणा सामानाची वसूली करून घेऊन येत असलेल्या आटो (अप्पे) चालकास चार अज्ञातांनी वाहन थांबवून त्याचे जवळ असलेली ८० हजार सातशे रुपयांची रोख रक्कम व आठ हजार रुपये किमतीचा मोबाईल लुटल्याची खळबळजनक घटना गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजताचे सुमारास घडली आहे.Thieves robbed 80,000 in broad daylight on Ghonsa road
वणी शहरातील वाहेगुरु किराणा दुकानदार ग्रामीण भागातील छोट्या दुकानदारांना किराणा सामानाचा पुरवठा करतो. गावागावात किराणा पोहचविण्यासाठी मूर्धोनी येथील जितेंद्र तुळशीराम रिंगोले, व त्याचा मदतनीस लक्ष्मण मेश्राम हे तालुक्यातील घोंसा,रासा, दहेगाव येथे सामान पोहचवून व सामानाच्या वसुलीचे ८० हजार रुपये घेऊन परत येत असताना मारेगाव(कोरंबी) जवळील विद्यालयाजवळ दोन दुचाकीवर बसून चार तरुण आले.
त्या तरुणांनी आटो थांबवून मदतनीस लक्ष्मण याला मारहाण करू लागले. प्रसंगी जितेंद्र ने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता त्याचे जवळील बॅगेमध्ये असलेले ८० हजार सातशे रुपये व आठ हजार रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण ८८ हजार सातशे रुपयांचा मुद्देमाल घेऊन चोरट्यानी पोबारा केला.
या घटनेची तक्रार जितेंद्र तुळशीराम रिंगोले याने वणी पोलिसांत दाखल केली असता अज्ञात तरुण लुटारू विरुद्ध भा दं वि ३९४ कलमानव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

.jpg)