राहुल गांधी सोबत चर्चेचे आव्हान भाजपने स्वीकारले
Sangini News
गेल्या आठवड्यात माजी न्यायमूर्तींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, व खा. राहुल गांधी यांना सार्वजनिक वादविवाद चर्चेचे निमंत्रण दिले होते. काही अवधी लोटल्यानंतर अखेर भाजपने चर्चेचे आव्हान स्वीकारले आहे.BJP accepted the challenge of discussion with Rahul Gandhi
सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराचा धडाका चालू आहे. यातच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सतत महाराष्ट्र दौरे वाढले आहे. आरोप प्रत्यारोप ,सुरूच आहे. काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला होता. गेल्या दहा वर्षांपासून सत्तेत असलेले भाजपा विकासाचे मुद्दे सोडून मंदिर,हिंदू मुस्लिम असे मुद्दे पुढे करतांना दिसत आहे. तर दुसरीकडे जनतेचे प्रश्न घेऊन इंडिया आघाडीचे राहुल गांधी मैदानात उतरले आहेत. याच पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टाचे सेवानिवृत्त न्यायाधीश मदन बी लोकूर,,दिल्ली हायकोर्टाचे से नि न्यायाधीश अजित पी शहा, दैनिक हिंदू चे चीफ एडिटर तथा वरिष्ठ पत्रकार एन राम यांनी नरेंद्र मोदी यांना सार्वजनिक वादविवाद खुल्या चर्चेसाठी निमंत्रित केले होते. प्रसंगी राहुल गांधी यांनी निमंत्रण स्वीकारले होते. परंतु भाजप कडून नरेंद्र मोदी यांनी कोणतेही सूतोवाच केले नव्हते. अखेरभाजपचे तेजस्वी सुर्या यांनी चर्चेचे निमंत्रण स्वीकारत भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष अभिनव प्रकाश यांना पुढे केले आहे.
समाज माध्यमांवर जोरदार चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी व खा राहुल गांधी यांच्या सार्वजनिक वादविवाद चर्चे संदर्भात समाज माध्यमांवर चर्चेला उधाण आले होते. बहुतांश लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या चर्चेत सहभागी होणारच नाही अशा टिप्पण्या करीत होते. अगदी तसेच झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सार्वजनिक वादविवाद चर्चेसाठी निमंत्रित असतांना एका युवा मोर्चा च्या उपाध्यक्षांना पुढे करून अलगत बाजूला झाल्याच्या टिप्पण्या समाज माध्यमातून केल्या आहेत.

.jpg)