-->

साडेनऊ वर्षात आमदारांना आत्ताच दिसले अवैध धंदे? In nine and a half years, MLAs have just seen illegal businesses?

0


साडेनऊ वर्षात आमदारांना आत्ताच दिसले अवैध धंदे?


Sangini News


वणी विधानसभा क्षेत्रात असलेल्या जनतेचे प्रश्न विधानसभेत मांडून त्यांना न्याय देण्याऐवजी गेल्या साडेनऊ वर्षाच्या कार्यकाळात आमदारांनी शहरात सुरू असलेल्या मटका जुगार चालत असलेल्या ठिकाणी धाड मारून जणू एक प्रकारचा स्टंटच केला आहे. कालावधीच्या सरते शेवटी आमदारांना आत्ताच मटका केंद्र दिसले का? याबाबत उलटसुलट चर्चा जोर धरू लागली आहे. तूर्तास हा खेळ पोलीस विभागाला अकार्यक्षमतेची जाणीव करून देण्यासाठी खेळला की, विशिष्ट व्यावसायिकांसाठी हे एक कोडेच आहे.In nine and a half years, MLAs have just seen illegal businesses?

साडेनऊ वर्षात आमदारांना आत्ताच दिसले अवैध धंदे?



वणी विधानसभा क्षेत्राचे गेले साडेनऊ वर्ष प्रतिनिधित्व करीत असलेल्या विद्यमान आमदारांनी येथील शेतकरी,बेरोजगार सामान्य माणूस आणि औद्योगिक क्षेत्रासाठी विधिमंडळात कधी प्रश्न उपस्थित केल्याचे अद्याप दिसून आले नाही.

शेतकऱ्यांच्या शेतमालाला अत्यल्प भाव, खत,बियाणे, कीटकनाशके आदींचे वाढते. यासंदर्भात कधीही बाजू मांडली नाही. किंबहुना त्यांच्यासाठी पुढाकार घेतांना दिसले सुद्धा नाही.

आईवडिलांनी कष्ट करून आपल्या मुलांना उच्चशिक्षित केले. त्याचेवर भरमसाठ खर्च केला. मात्र येथील उच्चशिक्षित बेरोजगार रोजगारासाठी अद्यापही भटकंती करतो आहे. वणी क्षेत्रात कोळसा,सिमेंट, तेल कंपन्या आहेत. सदर ठिकाणी परप्रांतीय मजूर कामाला आहे. केवळ पक्षपाती धोरण राबवित मर्जीतील बेरोजगारांना कामे दिली आहेत. परिणामी हजारो तरुण बेरोजगार फिरत असल्याचे दिसते आहे. गेल्या दशकापासून सत्तेत असलेल्या महोदयांनी येथील शेतकरी ,शेतमजूर, सोबतच बेरोजगार युवक वाऱ्यावरच सोडून दिला आहे. अस्मानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी विधिमंडळात एकही प्रश्न न विचारणारे लोकप्रतिनिधी या क्षेत्राला लाभले असे आवर्जून नमूद करावे लागते आहे.

येथील जनतेच्या समस्या अलगत बाजूला ठेऊन मागील आठवड्यात साहेबांनी अवैध मटका व्यावसायिक यांच्या केंद्रावर धाड सत्र सुरू केले होते. यातही विशेष म्हणजे मोठ्या केंद्रावर धाड मारण्याऐवजी लहान व्यावसायिकांना टार्गेट केल्याची जोरदार चर्चा होती. या धाडीमागे नेमके कारण काय? असे प्रश्न अनेकांना आवर्जून पडले होते. कारण गेल्या साडेनऊ वर्षाच्या कार्यकाळात अवैध मटका,जुगार सुरू नव्हता का? अनेक ठिकाणी दरडोई हे व्यवसाय सुरूच होते. मात्र त्या काळात लोकप्रतिनिधी ना ते दिसले नाही की, सब आलबेल होत. मग अचानक हा स्टंट कशासाठी? पोलीस अकार्यक्षम असल्याचे दाखविण्यासाठी की स्वतःचा उदोउदो करण्यासाठी? जर धाड सत्र राबवायचे होते तर शहरात,शहराबाहेर असलेल्या गावागावात राबविणे क्रमप्राप्त होते. त्यातही लहान मासे गळाला लावून स्टंट करणे म्हणजेच बड्या माशांना सुरक्षित करण्यासाठी तर मटका केंद्रावरील धाड सत्र नव्हते ना? असे अनेक प्रश्न चर्चेतून उपस्थित व्हायला लागले आहे. सत्ता असतांना सोबतच लोकप्रतिनिधी असतांना संबंधित विभागाला आदेश देण्याऐवजी स्वतः अवैध मटका जुगार केंद्रावर जाणे या मागे नेमके कारण तरी काय? या स्टंटवरून सध्यातरी एकच प्रश्न निर्माण होतो की,लोकप्रतिनिधींचा प्रशासनावर वचक नाही की अन्य काही. गेल्या साडेनऊ वर्षाच्या कार्यकाळत सामान्य जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी न झटता स्वतः अवैध धंद्याचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी झटणारे एकमेव लोकप्रतिनिधी म्हणून भविष्यात ख्याती होणार यात नवल नाही?

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top