मारेगावात बोगस बियाणे साठविणारे अटकेत
Sangini News
सध्या खरिपाच्या हंगामाची लगबग सुरू झाली आहे. शेतकऱ्यांनी शेतजमिनी पेरणीसाठी सज्ज केल्या आहेत. बियाणे खरेदीची लगबग सुरू होणार असल्याने चोरट्या बियाणांची साठवणूक होत असल्याची माहिती कृषी अधिकारी यांना मिळताच त्यांनी मारेगाव पोलिसांच्या मदतीने चिंचाळा येथील गोठ्यात धाड टाकून बोगस बियाणे जप्त करून संशयितांना ताब्यात घेतले आहे.
पुढील हंगामासाठी शेतकऱ्यांकडुन बियाणांच्या खरेदीची लगभग सुरु होणार आहे. परिणामी या शेतकऱ्यांची फसवणुक करणारे बोगस बियाने बाजारात विक्री साठी येत असल्याची गोपनीय माहिती क्रुषी विभागाला प्राप्त झाली असुन आज तालुक्यातील चिंचाळा येथे छापा टाकुन लाखाचे बोगस बियाने जप्त करण्यात प्रशासनाला यश आले आहे.विलास चिकटे (44)चिंचाळा असे बोगस बियाणाची कारवाई करण्यात आलेल्या संशयीतांची नाव आहे. गुरे बांधण्यासाठी वापर करण्यात येणार्या गोठ्यात हा लाख रुपयांचे बियाने साठवुन ठेवण्यात आले होते. या बाबतची माहिती क्रुषी अधिकारी संदीप वाघमारे यांना प्राप्त होताच गांभीर्याने दखल घेत ही कारवाई करण्यात आली आहे.जप्त करण्यात आलेल्या बोगस कपास बियानाच्या विक्रीतुन मोठी कमाई करण्याचा मनसुबा संशयीतांचा होता. मात्र या हंगामासाठी अशी बोगस बियाणांचा शिरकाव होणार नाही यासाठी क्रुषी विभाग अलर्ट आहे. जप्त करण्यात आलेल्या या बोगस बियानाच्या पिशव्यांवर वर कोणत्याही जबाबदार कंपणीचे नावाचा उल्लेख आढळुन आलैला नाही.या प्रकरणात वणी येथील अजय भोयर,शामसुंदर,आणि विलास चिकटे यां तिघाचे विरोधात विविध कलमान्वये मारेगाव पोलीसात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. मात्र कारवाई च्याभितीने दोन संशयित पसार होण्यात यशस्वी ठरले आहे. पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहे.

.jpg)